Sign In New user? Start here.
avatarachi gosht on zee talkies

छोटा पडदा असो वा मोठा, सध्या दोन्हीकडे चलती आहे ती बच्चे कंपनीची. सुट्टीमुळे बच्चेकंपनीची गाडी जोरात आहे हे लक्षात घेऊनच झी टॉकीज खास बच्चेकंपनीसाठी वेगवेगळ्या सिनेमांची मेजवानी घेऊन येत आहे.

"avatarachi gosht on zee talkies"

 
 

झी टॉकीजवर ‘अवताराची गोष्ट ’चा महाप्रिमीअर

छोटा पडदा असो वा मोठा, सध्या दोन्हीकडे चलती आहे ती बच्चे कंपनीची. सुट्टीमुळे बच्चेकंपनीची गाडी जोरात आहे हे लक्षात घेऊनच झी टॉकीज खास बच्चेकंपनीसाठी वेगवेगळ्या सिनेमांची मेजवानी घेऊन येत आहे. एशियन एंटरटेंनमेंट निर्मित ‘अवताराची गोष्ट’ हा सिनेमा येत्या रविवारचं ( २४ मे ) विशेष आकर्षण ठरणार आहे. छोट्यांप्रमाणे मोठ्यांनाही या चित्रपटाची भेट देत झी टॉकीज रसिकांचा हा रविवार अधिक रंजक करणार आहे.

कल्पनाविश्वात सुरस चमत्कारिक अन् साहसी जगात रममाण झालेले हे दोन चिमुरडे आणि त्यांच्या भावविश्वाची ही कथा आहे. बालकलाकाराच्या भूमिकेत मिहरेश जोशी व यश कुलकर्णी आहेत. या बालकलाकारसह सुलभा देशपांडे, लीना भागवत, सुनील अभ्यंकर, आदिनाथ कोठारे व रश्मी खेडेकर यांच्याही भूमिका आहेत.

या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका महत्वपूर्ण आणि वेगळ्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे. आदिनाथच्या भूमिकेला अनेक कंगोरे असून नॉनग्लॅमरस भूमिकेत तो पहिल्यांदाच दिसेल. २४ मे ला रविवारी दुपारी ३ वाजता व रात्री ९ वाजता निरागस कल्पनाविश्वाची सफर घडेल. लहान मुलांना मध्यवर्ती भूमिका देऊन आधुनिक भोंदूगिरीवर भाष्य करण्याचा सूक्ष्म प्रयत्न 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाद्वारे केला आहे.

देवांचा अवतार हा लहानांपासून थोरापयंत प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. देवाने अवतार घेतल्याच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात. अशाच प्रकारे जर एखाद्याला आपण देवाचा अवतार असल्याचं वाटू लागलं तर काय धमाल होईल?हीच धमाल या चित्रपटातून पाहायला मिळेल. निर्माते सचिन साळुंके दिग्दर्शक नितीन दिक्षित यांचा हा सिनेमा रसिकांच्या मनाला स्पर्शून जाईल.

 

 

--------------------