Sign In New user? Start here.

कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत पार्वती घेणार भद्रकालीचा अवतार!

bhdrakali avtar in marathi serial
कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत पार्वती घेणार भद्रकालीचा अवतार!
LIGHT-HOUSE"
 
 

कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेत पार्वती घेणार भद्रकालीचा अवतार!

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळवलेल्या कलर्स मराठीवरील ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेने आजवर अनेक वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांना दाखवल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेत पार्वतीचा भद्रकालीचा अवतार प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सोमवार १० ऑक्टोबरला रात्री ८.३० वा. या भागाचे प्रसारण केले जाणार आहे. पार्वतीचा हा भद्रकाली अवतार कशासाठी याची रंजक कथा या भागात पहायला मिळणार आहे.

रावण कठोर तप करून महादेवांना प्रसन्न करून घेतो. महादेव रावणाची भक्ती आणि तप बघून त्यावर प्रसन्न देखील होतात. रावण ब्रम्हदेवांच्या सांगण्यावरून महादेवांकडे शक्ती मागतात कारण शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे, शक्ती जर रावणाबरोबर लंकेत आली तर तिच्या बरोबर महादेव देखील लंकेत येतील. गणेशाच्या सांगण्यावरून पार्वती रावणाच्या मागोमाग जायला राजी होते. रावण शक्तीला घेऊन लंकेत जायला निघतो. गणेश रावणाला अट घालतो की लंकेत पोहोचेपर्यंत त्याने मागे वळून जर पाहिले तर शक्ती वचनातून मुक्त होईल. भूलोकावर नारदांच्या रूपात गणपती रावणाला संभ्रमात टाकून मागे बघायला भाग पाडतो. आराध्यांवर अविश्वास दाखवला म्हणून शक्ती रौद्र रूप धारण करते. गणेश महादेवांना आदेश करतो महादेव भद्रकालीच्या पायाखाली शरण जातात आणि तिचा क्रोध आपोआप शांत होतो. गणेशाच्या आशीर्वादाने पार्वती तिथे भद्रकाली रूपात वास्तव्य करू लागते. गणपती बाप्पा मोरया मध्ये प्रेक्षकांना ही कथा बघायला मिळणार आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’ १० ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.