Sign In New user? Start here.
chala hava yaou dya 100 episode complited
डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो झी मराठीवर
Dr.prakash baba amte movie on zee marathi "
 
 

"चला हवा येऊ द्या" १०० भाग पूर्ण

"चला हवा येऊ द्या” असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर करणा-या या कार्यक्रमाने १०० भाग नुकतेच पूर्ण केले. या १०० भागांच सेलीब्रेशन नुकतच सेटवर केक कापून करण्यात आले.मराठी चित्रपट, नाटक यांच प्रमोशन किंवा लॊंकापर्यंत यासर्वाची माहिती नीट पोहचत नव्हती. किबंहुना ती योग्यरित्या आणि ते ही मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचावी म्हणून या कार्यक्रमाची निर्मीती केली गेली. हिंदी मधील कॉमेडी वित कपील या कार्यक्रमाच्या थीम वर चला हवा येऊद्या हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला हा कार्यक्रम किती चालेल याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण जस जसे भाग होत गेले तस तसे कार्यक्रमामधे थोडे फार बदल होत गेले. कार्यक्रमाच्या सेट पासून ते कार्यक्रमातील कलाकारांपर्यंत. त्यामध्ये वेगवेगळ्या थीम वर स्किट, भरत गणेशपुरे व्दारा साकराला जाणारा सरपंच किंवा बांदेकर पात्राने लोंकाच्या मनात वेगळच स्थान मिळवल. सागर कांरडेच्या मिमीक्री, स्त्रीपात्र तेवढ्याच कुशलतेने रंगवन यामुळे लोंकाना पुढच्या भागात हा कोणत कॅरक्टर करतो याबद्दल उत्सुकता वाटत असते. कुशल बद्रीके व्दारा एसीपी किंवा नुकताच त्याने केलेला रजीनिकांत आजही लोंकाच्या लक्षात आहे. श्रेया बुगडेच भरभर बोलण तिने साकारलेले वेगवेगळॆ कॅरेक्टर लोंकाना खूप आवडतात. विनित बोंडे या उंचीने लहान असणा-या कलाकराची भूमिकेच्या वेगळेपणामुळे स्किटला वेगळीच मजा येते. अशा या कलाकारांच्या मेहनत आणि कॉमेडी टाईमिंगमुळे हा कार्यक्रम हिट होत आहे.

या सगळ्यांना जोडून किंवा एका धाग्यात गुंफणारा सुत्रधार डॉ.निलेश साबळे. तो करत असलेलं सुत्रसंचालन आणि त्याच्या लिखाणामुळे कार्यक्रम या उंचीपर्यंत पोहचला आहे. चला हवा येउ द्या १०० भागांच्या सेलिब्रेशनचा भाग लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

 

--------------------