Sign In New user? Start here.

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार

Chala Hawa Yeu Dya with Akshay Kumar
‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार
LIGHT-HOUSE"
 
 

‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ‘रूस्तम’ अक्षय कुमार

झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ च्या मंचावर बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीचा हा मंच आता हिंदावाल्यांनाही खुणावत आहे. या कार्यक्रमात आता बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार बघायला मिळणार आहे. आपल्या आगामी ‘रूस्तम’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अक्षय या कार्यक्रमात सहभागी झाला होता. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत.

थुकरटवाडीच्या ‘हेरा फेरी’ची आणि सीआयडीची धम्माल

चला हवा येऊ द्या मध्ये आलेल्या कलाकारांच्या प्रसिद्ध कलाकृतीवर चित्रपट काढण्याची हौस थुकरटवाडीतील मंडळीना असते. अक्षयच्या उपस्थितीतही या मंडळीने अक्षय कुमारच्या सुप्रसिद्ध ‘हेरा फेरी’ चित्रपटाची आपली वेगळी आवृत्ती सादर केली ज्याला अक्षयनेही भरभरून दाद दिली. याचसोबत थुकरटवाडीच्या पोलिस स्टेशनमध्ये अक्षयला बोलावून त्याच्यावर अनेक गंमतीशीर आरोपही करण्यात आले. अक्षयवरच्या या आरोपांची सखोल चौकशी करण्यासाठी मग कुशल बद्रिके आणि भाऊ कदमच्या सीआयडी टीमने एन्ट्री घेत एकच धम्माल उडवून दिली. अक्षयच्या गाण्यांवर थिरकली थुकरटवाडीची मंडळी अक्षय कुमार जसा स्टंटसाठी लोकप्रिय आहे तसाच त्याच्या अनेक लोकप्रिय गाण्यांच्या डान्स परफॉर्मन्ससाठीही प्रसिद्ध आहे. अक्षयच्या अशाच गाजलेल्या गाण्यांवर चला हवा येऊ द्या च्या कलाकारांनी ठेका धरला.

ज्यामध्ये कुशल बद्रिकेने ‘अफलातून’, भाऊ कदम आणि भारत गणेशपुरेने ‘जुम्मे रात है आजा साथ निभा जा’ आणि सागर कारंडे आणि श्रेया बुगडेने ‘टिप टिप बरसा पानी’ या गाण्यांवर नृत्य सादर केले. या सर्व कलाकारंचे हे धम्माल परफॉर्मन्स बघून मग अक्षयनेही त्यांना साथ देत ‘झिंगाट’च्या ठेक्यावर डान्स करत एकच धम्माल उडवून दिली.अक्षयच्या उपस्थितीने रंगलेले चला हवा येऊ द्या चे हे धमाकेदार भाग येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ८ आणि ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. झी मराठीवरून प्रसारित होतील.

--------------------