Sign In New user? Start here.

“कॉमेडीची बुलेट ट्रेन”

 
 

“कॉमेडीची बुलेट ट्रेन”

१८ ऑगस्ट २०१४ पासून दर सोमवार व मंगळवारी रात्री ९.०० वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन हा नवीन विनोदी कार्यक्रम ई टिव्ही मराठी वर प्रसारीत केला जाणार आहे. मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासातील हा पहिलाच कॉमेडी टॅलेंट शो असून तो महाराष्ट्रातील विनोदाची जाण असलेल्या नवोदित कलाकारांसाठी मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज विनोदी कलावंतांकडून शिक्षण व अभिनयाचे मार्गदर्शन मिळवून देणारे व्यासपीठ ठरणार आहे. येत्या सोमवारी या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे प्रसारण होणार आहे.

मराठी दूरचित्रवाणीवर विनोदी कार्यक्रमाचे प्रवर्तक असलेल्या ‘ईटीव्ही मराठी’ च्या या नव्या कार्यक्रमातून लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे पुनरागमन करत आहे. तिच्यासमवेत परीक्षक म्हणून विनोद सम्राट मकरंद अनासपुरे असतील. ‘वेट क्लाऊड प्रॉडक्शन्स ने निर्मित केलेला हा कार्यक्रम पंढरीनाथ कांबळे, सुप्रिया पठारे. अंशुमन विचारे व विशाखा सुभेदार अशा नामवंत हास्य कलाकरांच्या सहभागामुळे मनोरंजकता वाढणार आहे.

एखाद्या विनोदी कार्यक्रमाचे परीक्षण करण्याच्या अनुभवाबाबत बोलताना अभिनेत्री रेणुका शहाणॆ म्हणाली की ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचे स्वरूप अनोखे आहे. महाराष्ट्रातील विनोदी बुध्दीमान कलाकारांना हा कार्यक्रम जोपासनेचे व्यासपीठ मिळवून देणारा आहे आणि प्रेक्षकांनाही तो अत्यंत आवडेल, याची मला खात्री आहे. आपल्या चिंता विसरून कुटूंबासमवेत हास्ययात्रेचा आनंद घेण्याची संधी प्रेक्षकांना या कार्यक्रमातून मिळेल.

मकरंद अनासपुरे म्हणाले की हास्य ही क्षणार्धात चेतना निर्माण करण्यास सर्वाधिक कठीण भावना असते. म्हणूनच लोकांना त्यांच्यातील सुप्त गुण प्रदर्शित करण्यास व्यासपीठ मिळवून देणा-या, तसेच मार्गदर्शन करणा-या या कार्यक्रमाचा भाग बनणेही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. मराठी मनोरंजनाच अंगभूत भाग असलेल्या विनोद विश्वात आपली स्वतंत्र ऒळख निर्माण करू इच्छिणा-या नव्या विनोदी कलाकारांना हा कार्यक्रम वाव देईल.

कॉमेडीची बुलेट ट्रेन हा मराठी दूरचित्रवाणीच्या इतिहासात अशा स्वरूपाचा पहिलाच कार्यक्रम असून त्यात महाराष्ट्रातून निवडलेले ८ विनोदी कलाकार आपले गुण सादर करणार आहेत. त्यांना मराठी दूरचित्रवाणी विश्वातील ८ दिग्गज मार्गदर्शन करणार असूण त्यामध्ये योगेश शिरसाठ, नम्रता आवटे, शशिकांत केरकर व प्राजक्ता हणमधर या अनुभवी कलाकारांचा समावेश आहे. विनोदाचे भावी सम्राट व सम्राज्ञी बनू इच्छीणा-या नवोदित कलाकारांचे हे दोन स्पर्धक संघाला मार्गदर्शन करणार आहेत.

-----------