Sign In New user? Start here.
dil dosti duniyadari 100 episode complied

दिल दोस्ती दुनियादारीच्या" १०० भागांच सेलिब्रेशनला टींम मधले कलाकाराच नाही

"zee comedy awards 2015"

 
 

"दिल दोस्ती दुनियादारीच्या" १०० भागांच सेलिब्रेशनला टींम मधले कलाकाराच नाही.

संजय जाधव यांची मालिका "दिल दोस्ती दुनियादारी" ही अल्पवधीतच खूप लोकप्रिय झाली. या मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले. मालिकेच्या सेटवर केक कापून छोटस सेलिब्रेशन करण्यात आलं. पण या सेलिब्रेशनला सेटवरचे बरेच कलाकार अनुपस्थित होते. मिनल म्हणजे स्वानंदी  टिकेकर अमेरिकेला गेल्यामुळे आणि कैवल्य म्हणजेच अमेय हा त्याचा शटर चित्रपटाच्या प्रमोशनमधे अडकल्यामुळे या सेलीब्रेशनमधे सहभागी नाही होऊ शकला. पण झी परिवारातर्फे या दील दोस्ती दुनियादारी टीमच नंतर मोठ सेलिब्रेशने केलं जाणार आहे. कारण सर्व असल्याशिवाय सेलिब्रेशनला मजा नाही होना?

ही मालीका खूप अल्पवधीतच लोकांना खूप भावली . मालिका लोकप्रिय हॊण्याची अनेक कारणं आहेत. प्रत्येकाच्या मनात मित्रांन सोबत घालवलेले क्षण लक्षात असतात. त्यामुळेच ही मालिका प्रत्येकाला आपली वाटत असावी. बाकी मालिकांसारखे रटाळ चालणारे विषय यामधे नाही. छोट्य छोट्या गोष्टी एक किंवा दोन एपिसोड मधे संपणा-या गोष्टींमुळे पाहणा-यालाही ती आपलीशी वाटते.

आशू, मिनल, अ‍ॅना, स्कॉलर, रेश्मा, कैवल्य ही कॅरेक्टर आपल्या आवती भवती नेहमी असतात. मोठी स्वप्न रंगवून छोट्या घरामधे राहणा-या व्यक्तिरेखामधे प्रेक्षकांना आपले हरवलेले मित्र मैत्रीणी सापडतात. एकूणच काय आपली हरवलेले स्वप्न किंवा क्षण अशा मालिकांमधून प्रेक्षक शोधत असतात आणि त्यामुळे त्यांना ती आपलीशी वाटतात आणि अर्थातच मनोरंजन हा सर्वात मोठा भाग झाला. त्यामुळे या मालिकेत आणखी नवे नवे विषय हाताळण्यात आले तर नक्कीच ही मालिका लांबचा पल्ला गाठेल.

 

 

--------------------