Sign In New user? Start here.
duheri serial completed 50 episode
दुहेरी मालिकेचे ५० भाग पूर्ण
LIGHT-HOUSE"
 
 

दुहेरी मालिकेचे ५० भाग पूर्ण

स्टार प्रवाह वरील रहस्यमय‘दुहेरी’ मालिका ३० मे पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. आता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठला आहे.

एका बहिणीसाठी दुस-या बहिणीने आपली बदललेली ओळख अशी ही कधीही न पाहिलेली दोन बहिणींची थरारक कथा, संजय जाधव यांचे दिग्दर्शन, निवेदिता सराफ, तुषार दळवी, सुनील तावडे आदी कलाकारांचा सहभाग या सगळ्या गोष्टींनी प्रेक्षकांना या मालिकेत गुंतवून ठेवण्यात दुहेरीच्या संपूर्ण टीमला यश मिळालं आहे.

प्रेक्षकांनी या मालिकेला अगदी पहिल्या भागापासूनच पसंती दर्शवली आहे आणि आज दुहेरीच्या 50 भागांचा पल्ला गाठल्याचा निमित्ताने दुहेरीच्या सेट वर केक कापून आनंद साजरा करण्यात आला.

--------------------