Sign In New user? Start here.

हॉग कॉंगमध्ये मराठी कलाकारांची धमाल

Zee Marathi World TV Premiere - Timepass Movie

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या कामाची दखल आता अमेरीकेत स्थायिक असलेल्या मराठी माणसांनी घेतली आहे

"Etv Marathi- imffa Awards"

 
 

हॉग कॉंगमध्ये मराठी कलाकारांची धमाल

नुकत्याच हॉग कॉंगमध्ये स्टार क्रुझ वर्गो येथे झालेल्या इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल अवार्डस (इम्फा) मध्ये मराठी कलाकारांनी एका पेक्षा एक परर्फामन्स सादर केले. यामध्ये भरत जाधव, सई ताम्हणकर, मानसी नाईक, अमृता खानविलकर इत्यादी कलाकारांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे प्रसारण ईटीव्ही मराठीवरून ९ नोव्हेंबर २०१४ रोजी संध्याकाळी ७ वाजाता केले जाणार आहे.

इम्फा कार्यक्रमात आपल्या कॉमेडीने संपूर्ण महाराष्ट्राल प्रेमात पाडणा-या भरत जाधव यांना अनेक पारितोषिके मिळाली आहेत. पारितोषिक वितरण सोहळ्या दरम्यान त्यांनी विविध स्कीट सादर केले. मात्र हॉंगकॉगमध्ये १० वर्षानंतर इम्फा पारितोषिकांच्या वेळी भरत जाधव यांनी नवरी नटली या आगामी चित्रपटातील गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

अभिनेता भरत जाधव म्हणाले, पहिल्यांदाच मराठी इतक्या मोठ्या प्रमाणावर एक सिने पारितोषिक वितरण सोहळा झाला. मुळात मला मंचावर नृत्य करणे फारसे आवडत नसल्यामुळे मी १० वर्षापूर्वी मी मंचावर नृत्य करणे बंद केले होते. पंरतु पहिल्यांदाच मराठीत इतका मोठ्या पारितोषिक सोहळा होत असल्याने मला इम्फाच्या मंचावर नृत्य सादर करण्याची संधी गमवायची नव्हती. सर्वात महत्वाचे म्हणजे गाणे सुरू झाल्याबरोबर प्रेक्षकांनी जी दाद दिली ती अविस्मरणीय होती.

यावेळी अभिनेत्री मानसी नाईक हिने हिप्स डोन्ट लाय या गाण्यावर लावणी सादर केली. तिच्या नृत्याने प्रेक्षकांना देखील वेड लावले. सोनाली कुलकर्णीने टाईमपास चित्रपटातील तर अमृत्या खानविलकर हीने रागिने एमएमएस २ या सनी लिऒनच्या बेबी डॉल या गाण्यावर सादर केलेले नृत्य आकर्षण ठरले. त्याचबरोबर शर्वरी जेमिनीस, प्रार्थना बेहरे आणि अभिजित केळकर, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर यांनीही नृत्य करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

 

--------------------