Sign In New user? Start here.

विजय तेंडूलकरांच्या नाटक कमालावर आधारीत नवी मालिका कमला

 Etv Marathi launch new fiction Kamala

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या कामाची दखल आता अमेरीकेत स्थायिक असलेल्या मराठी माणसांनी घेतली आहे

" Etv Marathi launch new fiction Kamala"

 
 

विजय तेंडूलकरांच्या नाटक कमालावर आधारीत नवी मालिका कमला

नाटककार विजय तेंडूलकर यांच्या अनेक गाजलेल्या नाट्यकृतीपैकी एक नाटक कमला, या नाटकातून तेंडुलकरांनी केवळ माणसांच्या खरेदी-विक्रीच्या समस्येबरोबरच मुख्य तीन व्यक्तिरेखा सरीता, जयसिंग आणि कमला यांच्या भावविश्वातील आंदोलनही तितक्याच प्रकर्षाने आपल्या नाटकातून मांडली होती. या नाटकावरून प्रेरणा घेत कमला या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता ईटीव्ही मराठी वर पाहायला मिळणार आहे.

कमलाची कथा देवाशिष, शरयु आणि कमला या तीन मुख्य व्यक्तिरेखांभोवती फिरते. अभिनेता कोठारी हा धडाधडीचा पत्रकार देवाशिष देशपांडेच्या भूमिकेत तर अभिनेत्री दीप्ती केतकर त्याची पत्नी शरयुची भूमिका साकारत आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धामधून आपल्या अभिनयाची झलक दाखवलेली नवोदित अभिनेत्री अश्विनी कासार कमलाची भूमिका साकारत आहे.

ई टीव्ही मराठीचे कॅटॆट हेड संजय उपाध्यय म्हणाले, आमच्या तू माझा सांगाती या कार्यक्रमाला मिळालेल्या उदंड प्रतिसादाने नवनवीन प्रयोग करून अधिक चांगल्या मालिका घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. कमलामध्ये शरयूची भावनिक गुंतागुंत दाखविण्यात येणार आहे. शरयू एक उच्च शिक्षित चांगल्या घरात लग्न करून आलेली मुलगी आहे, पुढे जेव्हा तिच्या आयुष्यात कमला-गुलामगिरीच्या सापळ्यात अडकलेली मुलगी येते तेव्हा अगदी भिन्न पार्श्वभूमी असून देखील एक अपरिचित अस साम्य तिला जाणवते. तिच्या भावनिक आंदोलनासोबत ही मालिका पुढे सरकणार आहे. कथेत येणारी वळण ही आजच्या तरूण पिढीला खूप रिलेटेबल वाटतील अशी खात्री आहे.

सुरूवातीला कमला या मालिकेची निर्मिती कै.विनय आपटे करणार होते. कमला या नाटकाच्या इंग्रजी भाषेत केल्या जाणा-या प्रयोगात ते जयसिंगची मुख्य भूमिका साकारत असत. त्यामुळे या नाटकावर येणा-या या मालिकेसोबत त्यांची एक विशेष अशी भावनिक जवळीक होती. त्यांच्या निधनानंतर ही मालिका तितक्याच पोटतिडकीने कोण करेल हा मोठा प्रश्न होता. तेव्हा दशमी क्रिएशन्सच्या नितीन वैद्य यांनी या मालिका निर्मितीचा निर्णय घेतला. त्याच्यासोबत विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे या मालिकेच्या सहनिर्मात्या आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले असून विकास मयेकर यांनी कथा विस्तार केला आहे.

 

--------------------