Sign In New user? Start here.

युगंधरा या कादंबरीवर प्रेरित माझिया माहेरा नवी मालिका

Etv Marathi-Maziya Mahera

बहरणारी प्रीती आणि गुंतलेली नाती या धाग्यावर आधारित नवी मालिका माझिया माहेरा घेऊन येत आहे ई टीव्ही मराठी.

Etv Marathi-Maziya Mahera

 
 

युगंधरा या कादंबरीवर प्रेरित माझिया माहेरा नवी मालिका

एक मुलगी जेव्हा आपल्या वडिलांसाठी आपल्या स्वप्नांचा, प्रेमाचा त्याग करून, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निश्चय करते तेव्हा? बहरणारी प्रीती आणि गुंतलेली नाती या धाग्यावर आधारित नवी मालिका माझिया माहेरा घेऊन येत आहे ई टीव्ही मराठी. डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या "युगंधरा" या कादंबरीवर प्रेरणा घेत रंगभूमी प्रॉडक्शन माझिया माहेरा या मालिकेची निर्मिती केली आहे. ई टीव्ही मराठीवर २ फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांच्या युगंधरा या कादंबरीवर प्रेरित माझिया माहेरा एका मुलीच्या त्यागाची आणि कर्तुत्वाची अनोखी कथा आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या आशा-आकांक्षांना मुरड घालना-या पल्लवीची गोष्ट म्हणजे माझिया माहेरा आपल्या माणसांना जीवापाडा जपणारी आणी शिशिर वर भरभरून प्रेम करणारी पल्लवी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या मालिकव्दारे मराठी टीव्ही सृष्टीत पदार्पण करणारी नवोदित अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर पल्लवीचि भूमिका साकारत आहे. अनेक मालिका आणि सिनेमातून प्रेक्षकांची पसंती मिळवणारा अभिनेता विकास पाटील हा माझिया माहेरा मध्ये शिशिरच्या भूमिकेत दिसेल. ज्येष्ठ अभिनेते राजन भिसे पल्लवीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसतील.

 

--------------------