Sign In New user? Start here.
ratries khel chale againest fir
‘"रात्रीस खेळ चाले" या मालिकेला लागली नजर
LIGHT-HOUSE"
 
 

"रात्रीस खेळ चाले" या मालिकेला लागली नजर.

झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ विरोधात चिपळूण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भूत-प्रेत, आत्मा यासारख्या अंधश्रद्धांना खतपाणी मिळत असून कोकणची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलं आहे.

कोकणामध्ये भूतांच्या गोष्टी अनेकदा ऐकवल्या जातात. पूर्वापारपासून चालत आलेल्या या दंतकथांना कोणताही आधार नाही. अशाच काल्पनिक कथांवर आधारित ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं प्रक्षेपण सोमवार ते शनिवार रात्री 10.30 वाजता होतं. 22 फेब्रुवारी पासून सुरु झालेल्या या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. पहिल्याच भागात नाईकांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा होणार असतो, मात्र मंगलकार्याआधीच कुटुंबप्रमुख अण्णा यांचं निधन होतं आणि धक्कादायक घटनांना सुरुवात होते.

ही मालिका लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच पाहतात. यामुळे मुलं आपल्या गावी जाण्यास नकार तर देणार नाहीत ना अशी शंका देखील पालकांमध्ये आहे. या मालिकेच्या माध्यमातून कोकणाची बदनामी होत असल्याचा आक्षेप तक्रारकर्त्याने घेतला आहे. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्या अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अंधश्रध्दा निर्मूलन कायद्या अंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण कोकणातील एका गावात होत आहे. मालिकेची कथा-पटकथा संतोष अयाचित आणि आशुतोष पराडकर यांची असून संवाद प्रल्हाद कुडतरकर यांचे आहेत.‘साजरी क्रिएटिव्हज’ची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलं आहे.

--------------------