Sign In New user? Start here.
freshers navratri party
फ्रेशर्स नवरात्री पार्टी
LIGHT-HOUSE"
 
 
 

फ्रेशर्स नवरात्री पार्टी

फ्रेशर्स ह्या मालिकेमध्ये आजची तरुण पिढी, कॉलेजमधील फ्रेशर्सची अतरंगी यारी, त्यांच्या कॅम्पसमधली स्टोरीज अश्या तरुणाईच्या अगदी जवळच्या गोष्टी दाखवण्यात येतात . झी नेटवर्क ने केवळ आजच्या तरुणाईला एक हक्काचे व्यासपीठ देण्यासाठी झी युवा हि वाहिनी काढली . आज फ्रेशर्स हि मालिका सर्वच तरुणाईला स्वतःची स्टोरी वाटतेय आणि त्यामुळेच या मालिकेतील सगळेच कलाकार त्यांना आपल्यातील एक वाटत आहेत . सध्या सगळीकडे दांडिया आणि गरबाची मजा सुरु असताना , फ्रेशर्स मध्ये सुद्धा आता नवरात्रीची धमाल आपल्याला पाहण्यास मिळेल . वेगेवेगळ्या गावांमधून शहरांमधून आलेले हे फ्रेशर्स आपल्या नवीन मित्र मैत्रिणीबरोबर नवरात्रीची धमाल कशी करतात , त्यांना दांडिया आवडते कि हातांचा गरबा , कोण कोणाचे पार्टनर असणार , हि सर्व मजा , झी युवावर येणाऱ्या सोमवारी १० आणि ११ ऑक्टोबरला ७ वाजताच्या भागात दाखवले जाईल.