Sign In New user? Start here.
star pravaha new serial g sahajani
मराठी मालिकेत प्रथमच अंडरवॉटर चित्रीकरण
LIGHT-HOUSE"
 
 
 

टीव्ही मालिकांमध्ये येतोय,नवाप्रवाह

'स्टारप्रवाह 'ने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.वैविध्यपूर्ण विषय आणि नाविन्य पूर्ण कल्पना हे स्टार प्रवाहचे वैशिष्ट्य. समृ्द्ध मराठी संस्कृती जोपासतानाच 'स्टारप्रवाह' एक पाऊल पुढे टाकून अवघ्या महाराष्ट्राला आवाहन करत आहे 'आताथांबायचंनाय'.

पारंपरिक विचार सरणीमुळे मराठी माणूस धोका पत्करत नाही.आजच्या तरुणाई मध्ये बंदिस्त झाल्याची, अडकल्याची भावना आहे. मराठी माणसाची हीच भिडस्त प्रवृत्ती प्रगतीच्या नवनव्या वाटा आजमावून पाहण्यातला मोठा अडथळा ठरते आहे. याप्रवृत्तीला आणि मनोभूमिकेला आव्हान देऊन जन मानसात आत्मविश्वास प्रेरित करण्यासाठी स्टार प्रवाहवाहिनी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह घेऊन येत आहे. .

ग... सहाजणी

रोजच्या जीवनातील दगदग, समस्या आणि नोकरीवर जाणाऱ्या महिलांचं भावविश्व'ग... सहाजणी' या मालिकेतून नर्मविनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. सहानायिका हेया मालिकेचं वेगळेपण. या मालिकेतून ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डेबऱ्याच काळानं छोट्यापडद्याकडे वळलेआहेत. एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची ही गोष्ट, गिरीजा ओक-गोडबोले, ब्राँचहेड असलेल्याया बँकेत शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पौर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोडवळकर या अभिनेत्री मुख्यपदांवर आहेत. त्यांच्यासोबत अतुल तोडणकर, दिगंबरनाईक,शशिकांत केरकर,विनोद जाधव अशी कसलेल्या विनोदी अभिनेत्यांचीफौजआहे. पुरुषोत्तम बेर्डेया मालिकेचे क्रिएटिव्ह हेड असून दिग्दर्शनाची धुरा महेंद्र कदम यांनी सांभाळली आहे. प्रेक्षकांनानिखळ आनंद देणारी, मनोरंजक, नर्मविनोदी अशीही मालिका आहे. आता या' सहाजणी मिळून काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. 'स्टारप्रवाह' ने टीव्ही मालिकांमध्ये आणलेला हा नवा प्रवाह प्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरेल असा विश्वास वाहिनीला आहे.