Sign In New user? Start here.

"जुळून येती रेशीमगाठी" मालिका लवकरच घेणार निरोप

julun yeti reshimgathi serial closed
"जुळून येती रेशीमगाठी" मालिका लवकरच घेणार निरोप
3d rock concert at pune"
 
 

"जुळून येती रेशीमगाठी" मालिका लवकरच घेणार निरोप

झी मराठी वरील "जुळून येती रेशीमगाठी" मालिका तुम्हांला आवडते का? तुम्हीजर अशी अपेक्षा करत असाल की मेघनाला बाळ होईपर्यंत ही मालिका चालेलं तर मग असं काहीही नाहीये. कारण ही मालिका आता लवकरच बंद होणार आहे. मालिकेत सध्या मेघनाची पुन्हा मुंबईला बद्ली होणार आहे. कालच्या एपिसोड मध्ये बद्ली झालीये असं दाखवण्यात आलीये. मेघना मुंबईला येताच ही मालिका बंद होणार आहे.

मालिकेच्या निर्मात्यांना चॅनलकडून तशी नोटीस बजावण्यात आली आहे. या मालिकेने ५०० हून अधिक भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. यामालिकेतील मेघाना आणि आदित्य ही जोडी लोकप्रिय झालीच त्याचबरोब नाना आणि माई हे कॅरेक्टर ही तेवढेच लोकप्रिय झाली. सासू सुनेची भांडण किंवा घरामधले ताण तणाव असे विषय या मालिकेत खूप चांगल्या प्रकारे हाताळले गेले.

ही मालिक बंद झाल्यावर 'पती माझे सौभाग्यवती' ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या मालिकेत वैभव मांगले स्त्रीवेशात दिसणार आहे.

--------------------