Sign In New user? Start here.

"का रे दुरावा" मालिका कायमची दुरावणार.

ka re durava serial now closed
‘"का रे दुरावा मालिका" कायमची दुरावणार
LIGHT-HOUSE"
 
 

"का रे दुरावा" मालिका कायमची दुरावणार.

 

"जय आदीती" ही जोडी का रे दुरावा या मालिकेव्दारे प्रेक्षकांच्या पंसतीस उतरली. पण लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असून ती प्रेक्षकांपासून कायमची दुरावणार आहे.जवळ जवळ सव्वा वर्ष " का रे दुरावा" मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

आपल वैवाहिक आयुष्य लपवून ऑफिसमध्ये विवाहित व्यक्तींना नोकरी करण्यास परवानगी नसल्यामुळे नोकरी साठी एकाच ऑफीसमध्ये बॅचलर सारखे वागणारे जोडप प्रेक्षकांना खूपच भावल. "का रे दुरावा" या मालिकेच्या जागी "काहे पिया परदेस" ही मालिका २८ मार्चपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

एवढ्या दिवस हिंदी मालिकांमध्ये मराठी कुटुंब दाखवण्यात आली होती. पण या मालिकेत मराठी-हिंदी संस्कृतीचं दर्शन घडणार आहे.सुयश टिळक, सुरूची आडकर , सुबोध भावे म्हणजेच अविनाश सर, आऊ, रजनी. केतकर काका . देव टूर्समधली मंडळी अशा अनेक व्यक्तिरेखा या मालिकेमुळे प्रसिध्द जाल्या.

झी मराठी अवॉर्ड मध्ये या मालिकेने अनेक पुरस्कार पटकावले.या आधी झी मराठीवर प्रक्षेपित होणारे "होणार सून मी ह्या घरची", दिल दोस्ती दुनियादारी या मालिकांनी नुकताच निरोप घेतला.

--------------------