Sign In New user? Start here.

शनिवारवाड्यावर ‘पुनःश्च लोकमान्य’ या भव्यतम सोहळ्यात सादर करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा देदीप्यमान सोहळा येत्या शनिवारी २७ डिसेंबरला रात्री ९.३० वा. तसेच रविवारी २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वा. (पुनःप्रक्षेपण) झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

"lokmanya tilak on zee marathi"

 
 

झी मराठीवर ‘पुनःश्च लोकमान्य’

“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच..” भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र ठरलेल्या या गर्जनेचे उद्गाते होते ते लोकमान्य टिळक. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या आणि कार्याच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळा आयाम मिळवून देणारे लोकमान्य हे ख-या अर्थाने युगपुरूष होते. त्यांच्या धगधगत्या जीवनकार्यावर आधारित ‘लोकमान्य - एक युगपुरूष’हा चित्रपट येत्या २ जानेवारीला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे प्रथम रूप नुकतेच पुण्यातील ऐतिहासीक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यावर ‘पुनःश्च लोकमान्य’ या भव्यतम सोहळ्यात सादर करण्यात आले. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा देदीप्यमान सोहळा येत्या शनिवारी २७ डिसेंबरला रात्री ९.३० वा. तसेच रविवारी २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वा. (पुनःप्रक्षेपण) झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगतं पर्व असणा-या लोकमान्यांची जीवनगाथा ही असामान्य अशीच आहे. त्यांच्या कार्यावर आणि देशभक्तीच्या जाज्वल्य विचारांवर आधारित लोकमान्य हा चित्रपट असणार आहे. लोकमान्यांनी पुण्यात उभारलेल्या क्रांतीकारी लढ्याची धग देशभर पसरली. पुणे ही त्यांची कर्मभूमी म्हणून याच पुण्यात या चित्रपटाचा ‘फर्स्ट लुक’ प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला तेही मराठी अस्मिता आणि क्रांतीचं प्रतिक असलेल्या शनिवारवाड्यावर. कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ठरलं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेल्या लोकमान्यांच्या आठवणी. त्याबद्दल बोलतांना बाबासाहेब म्हणाले की,“लोकमान्य हे एक सच्चे देशभक्त होते. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने त्यांनी तरुणांच्या मनात स्फुलिंग चेतवले होते. सर्व स्तरातील, वर्गातील, धर्मातील तरुणांचा त्यांना पाठिंबा होता. टिळकांवर सर्वांचच प्रेम होतं. यांचं बोलकं उदाहरण म्हणजे टिळकांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम संस्कारप्रसंगी त्यांच्या पेटत्या चितेत एका तरुणाने उडी घेत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. तो तरूण मुस्लिम समाजातील होता. टिळकांना कायम धार्मिक चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न करणा-यांसाठी हे फार महत्त्वाचं उदाहरण आहे की टिळक हे सर्व समाजाचे नेते होते. समकालीन नेत्यांच्या तुलनेत लोकमान्यांचं असलेलं वेगळेपण आणि मोठेपण इतिहासात नाही तर गीतेत शोधावं लागेल.”

तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात झाली ती शर्वरी जमेनिस आणि सहका-यांनी नृत्यातून सादर केलेल्या गणेशवंदनेने. त्यानंतर उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं ते शाहिर जयदीप माळी आणि नंदेश उमप यांनी सादर केलेल्या शिवछत्रपती आणि लोकमान्यांच्या पोवाड्यांनी. कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू ठरला तो मंचावर लोकमान्य रुपातील सुबोध भावे अवतरले तो क्षण. “कोण कुठला इंग्लंड देश”म्हणत लोकमान्य मंचावर अवतरले. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”ही गगनभेदी घोषणा करताच रोमांचित झालेल्या प्रेक्षकांमधून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. एकंदरीत इतिहासाला पुनरूज्जीवत करणारा असा हा ऐतिहासिक क्षण तिथे उपस्थित हजारो लोकांनी अनुभवला.. तोच क्षण आता झी मराठीच्या प्रेक्षकांनाही अनुभवता येणार आहे ‘पुनःश्च लोकमान्य’ या कार्यक्रमातून. अतिशय भव्यदिव्य स्वरूपातील हा कार्यक्रम येत्या शनिवारी २७ डिसेंबरला रात्री ९.३० वा. तसेच रविवारी २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वा. झी मराठीवरून प्रसारित होणार आहे.

 

--------------------