Sign In New user? Start here.
Zee Marathi Awards 2015 ka re durava best serial
महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?नामांकनाचा पेटारा उघडला
Maharashtra cha favorite kon
 
 

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?नामांकनाचा पेटारा उघडला

निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आणखी एका खास निवडणुकीकडे लागलं आहे. ही निवडणूक आहे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्काराची. अल्पावधीतच रसिकांच्या मनात स्थान मिळविणार्‍या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? या सोहळ्याचे पडघम मनोरंजनसृष्टीत घुमू लागले आहेत. झी टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? पुरस्कारासाठीच्या मतदान प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार आहे. महाराष्ट्राची जनता आता कोणाला कौल देणार? या निवडणुकीत कोणाचा आवाज घुमणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वर्षांकाठी येणाऱ्या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा पुरस्कार सोहळा म्हणजेच महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा सन्मानसोहळा. रसिक प्रेक्षकांना आपल्या मतांचा कौल देता यावा या हेतूने महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा आगळा-वेगळा सन्मान सोहळा गेल्या सहा वर्षांपासून आयोजित होत असून यंदा सोहळ्याचे सातवे वर्ष आहे. रसिक प्रेक्षकांचा सर्वाधिक कौल मिळणाऱ्या नामांकनांमधून अंतिम विजेता घोषित होणार आहे.

या पुरस्काराच्या मतदानासाठी झी टॉकीज वाहिनीने दोन पर्याय उपलब्ध केले आहेत. पहिल्या पर्यायामध्ये नामांकन असलेल्यांना मिस्ड् कॅाल देऊन प्रेक्षक आपली मतं नोंदवू शकतात. ही मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे. दुसरा पर्याय हा डिजिटल मतदानाचा असून यासाठी झी टॉकीजच्या www. zeetalikes.com/mfk या वेबसाईटवर प्रेक्षकांना आपली मत नोंदवता येतील. ही मतदान प्रक्रियासुद्धा २१ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहणार आहे.

यंदाचा हा सोहळा १८ नोव्हेंबरला रंगणार असून रसिक प्रेक्षकांचा सर्वाधिक कौल मिळविणाऱ्या नामांकनांमधून अंतिम विजेता घोषित होणार आहे. घोषित झालेल्या नामांकनांमध्ये ‘डबलसीट’ व ‘टाईमपास २’ ने सर्वाधिक नामांकने मिळविली आहेत.

घोषित झालेली नामांकने खालीलप्रमाणे.

नामांकने

सर्वोत्कृष्ट गायक- अजय गोगावले- मन सुद्ध तुझं (डबलसीट), शंकर महादेवन–जगण्याचे भान हे (अगं बाई अरेच्चा २), विशाल दादलानी- वॅा वॅा (टाईमपास २), स्वप्नील बांदोडकर- सावर रे (मितवा), हर्षवर्धन वावरे, अमितराज – तेरी मेरी यारिया (क्लासमेटस), जसराज जोशी –किती सांगायचय मला (डबलसीट)

सर्वोत्कृष्ट गायिका- अपेक्षा दांडेकर– मदन पिचकारी (टाईमपास २), शाल्मली खोलगडे –फ्रेश (हॅप्पी जर्नी), जान्हवी प्रभू अरोरा – साव र रे (मितवा), श्रेया घोषाल- मोहिनी (डबलसीट), केतकी माटेगावकर- सुन्या सुन्या (टाईमपास २), आनंदी जोशी- किती सांगायचय मला (डबलसीट)

सर्वोत्कृष्ट गीत- किती सांगायचय मला (डबलसीट) वाऊ वाऊ (टाईमपास २), दगड दगड (एलिझाबेथ एकादशी), सुन्या सुन्या (टाईमपास २), मन सुद्ध तुझं (डबलसीट), तेरी मेरी यारिया (क्लासमेटस),

सर्वोत्कृष्ट नवोदित कलाकार- धरम गोयल (अगं बाई अरेच्चा २), गश्मीर महाजनी (देऊळ बंद),शिवराज वायचळ(अगं बाई अरेच्चा २), मानसी मोघे(बुगडी माझी सांडली ग), नेहा महाजन (निळकंठ मास्तर) पल्लवी पाटील (क्लासमेटस)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार– अर्चित देवधर (किल्ला), श्रीरंग महाजन (एलिझाबेथ एकादशी), सायली भांडारकवठेकर(एलिझाबेथ एकादशी), मिहीरेश जोशी(अवताराची गोष्ट), पार्थ भालेराव (किल्ला), पुष्कर लोणारकर (एलिझाबेथ एकादशी)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – सई ताम्हणकर (क्लासमेटस), नंदिता धुरी(एलिझाबेथ एकादशी), वंदना गुप्ते (डबलसीट), उर्मिला कानिटकर (प्यारवाली लव्हस्टोरी), शर्वाणी पिल्ले (पेइंग घोस्ट)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - वैभव मांगले (टाईमपास २), सिद्धार्थ चांदेकर (क्लासमेटस), विद्याधर जोशी(डबलसीट), पुष्कर श्रोत्री (पेइंग घोस्ट), संदीप पाठक(टाईमपास २),सर्वोत्कृष्ट स्टाईल आयकॉन- रितेश देशमुख, अंकुश चौधरी,स्वप्नील जोशी,श्रेयस तळपदे,वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी,पॉप्युलर फेस ऑफ द इयर- अमृता खानविलकर, स्पृहा जोशी, सई ताम्हणकर,प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत,सर्वोत्कृष्ट अभिनेता- नाना पाटेकर (डॉ.प्रकाश बाबा आमटे) अंकुश चौधरी (डबलसीट), अतुल कुलकर्णी (हॅप्पी जर्नी), अंकुश चौधरी(क्लासमेटस),स्वप्नील जोशी (प्यारवाली लव्हस्टोरी), प्रियदर्शन जाधव (टाईमपास २),सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रिया बापट(टाईमपास २), प्रिया बापट (हॅप्पी जर्नी),सोनाली कुलकर्णी (डॉ.प्रकाश बाबा आमटे), मुक्ता बर्वे (डबलसीट) सई ताम्हणकर(प्यारवाली लव्हस्टोरी), अमृता सुभाष (किल्ला),र्वोत्कृष्ट दिग्दर्शक- रवी जाधव (टाईमपास २), परेश मोकाशी (एलिझाबेथ एकादशी), समीर विद्वांस(डबलसीट), संजय जाधव (प्यारवाली लव्हस्टोरी), अविनाश अरुण (किल्ला),सर्वोत्कृष्ट चित्रपट - टाईमपास २, डबलसीट, एलिझाबेथ एकादशी, डॉ.प्रकाश बाबा आमटे, क्लासमेटस, किल्ला.

--------------------