Sign In New user? Start here.

tuza maza jamenaचाहूल मालिकेची शानदार पार्टी

new serial chahul on colors channel

 
 

चाहूल मालिकेची शानदार पार्टी

काही दिवसांपासून निर्माते आरव जिंदल यांच्या युफोरिया प्रॉडक्शन्सच्या चाहूल या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. प्रोमोजमधून उत्कंठा वाढवणाऱ्या या मालिकेच्या शुभारंभाची शानदार पार्टी कलाकार, तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकतीच रंगली. उत्कंठावर्धक विषय आणि तेवढ्याच रंगतदार पात्रांनी चाहूल मालिकेची गोष्ट सजली आहे.

युफोरिया प्रॉडक्शन्सची चाहूल ही रहस्यमयी मालिका १२ डिसेंबरपासून कलर्स मराठीवर रात्री १०.३० वाजता प्रसारित होत आहे. चाहूलच्या पहिल्या भागाचा आस्वाद सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांनी मिळून घेतला. त्यानंतर रंगलेल्या पार्टीत संपूर्ण युनिटच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसून येत होता. या मालिकेद्वारे हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते आरव जिंदल हे मराठीत पदार्पण करीत आहेत. ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा निश्चित ठाव घेईल, असा विश्वास निर्माते आरव जिंदल आणि दिग्दर्शक विनोद माणिकराव यांनी व्यक्त केला.

या मालिकेत अक्षर कोठारी, शाश्वती पिंपळीकर, लेझन, माधव अभ्यंकर, उमा गोखले, अनिल गवस, राजेंद्र शिसाटकर, विजय मिश्रा, शिल्पा वाडके, विशाल कुलथे, राधा कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सर्जेराव आणि जेनिफर यांच्या प्रेमात, त्यांच्या लग्नात अडथळा येऊ लागतो एका अज्ञात शक्तीमुळे… आणि मग प्रवास सुरू होतो एका गूढ शोधाचा, एका अमानवी रहस्याच्या भेदाचा… ही चाहूल आहे अकल्पिताची, अघटिताची आणि अधु-या राहिलेल्या एका प्रेमकहाणीची…

-----------------