Sign In New user? Start here.
pallavi patil entry in love lagna locha serial

लव्ह लग्न लोचा मध्ये पल्लवी पाटील ची धमाल एन्ट्री !

"zee comedy awards 2015"

 
 

"लव्ह लग्न लोचा मध्ये पल्लवी पाटील ची धमाल एन्ट्री !

झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेमध्ये सध्या बरीच मजा सुरू आहे . आधी राघव बाबाचे फंडे , नंतर ख्रिसमस पार्टी , त्यात सुमित ने सौम्याला केलेला प्रपोज आणि नंतर त्यांच्यात दरवाजाच्या कडीवरून झालेला गैरसमज आणि त्यांनतर शिक्षा मिळालेला आणि आता काहीसा सुधारलेला राघव, अश्या बऱ्याच घटनांनी सध्या हि मालिका तरुणाईमध्ये दिवसेंदिवस चांगलीच लोकप्रिय होत आहे . एवढे सगळे गोंधळ सुरु असताना एक नवीनच पण सुंदर ट्विस्ट लव्ह लग्न लोचा च्या मालिकेत आले आहे . लग्नमंडपातून पळून आलेली एक सुंदर मुलगी , जिचं राघव वर अतोनात प्रेम आहे आणि तिला राघवशीच लग्न करायचे आहे . हो म्हणजे आता कुठे राघव थोडासा सुधारतं होता पण त्याचा भूतकाळ काही त्याला सुधारू देईल असे वाटत नाही. एक्टरेस पल्लवी पाटील हि रुचा या राघवच्या एक्स गर्लफ्रेंड च्या भूमिकेतून आपल्याला भेटायला येत आहे . राघव आणि रुचा चे आधी प्रेम प्रकरण होते. म्हणजे राघवने रुचा ला कधीकाळी पटवले होते आणि हा पट्ठ्या हे विसरून सुद्धा गेला होता . आता बरोबर जेव्हा साहेबानी थोडंसं सुधारण्याचं मनावर घेतलंय अगदी तेव्हाच रुचा ची एन्ट्री झालीय . आणि नुसती एंट्री नाहीतर ती तिच्या लग्नाच्या मंडपातून केवळ आणि केवळ राघवच्या प्रेमाखातर पळून आली आहे .आणि तिला फक्त आणि फक्त राघवशीच लग्न करायचं आहे .

हा ट्रॅक सध्या एका हटके मोड वर आलाय . सुधारलेला राघव , चांगुलपणामुळे आता रूचा शी लग्न करायला तयार झालाय खरा पण घरातले सगळेच या गोष्टीच्या विरोधात आहेत .आणि या विरोधासाठी सगळेच स्वतःची कंबर कसत आहेत . राघवने रुचाशी लग्न करू नये या साठी आता नेहमीच राघवाच्या विरोधात असलेली काव्या आणि अभिमानाची बायको शाल्मली ह्या दोघीनांही राघवशी लग्न करायचे आहे . आता हे काय गौडबंगाल आहे आणि राघव आता नक्की कोणाबरोबर लग्न करणार हे पाहण्यासाठी बघत राहा लव्ह लग्न लोचा रोज रात्री ८:३० वाजता फक्त झी युवावर.

 

--------------------