Sign In New user? Start here.
ratris khel chale now closed
रात्रीस खेळ चाले" गायब होणार आणि येणार ३ डी
LIGHT-HOUSE"
 
 

‘"रात्रीस खेळ चाले" गायब होणार आणि येणार ३ डी

झी मराठीवरील मालिका "रात्रीस खेळ चाले" अनेक कारणांमुळे चर्चेत आली. यामध्ये दाखवल्या जाणा-या गोष्टी मनोरंजना पेक्षा अंधश्रद्धेला प्रेरणा देतात असेही म्हंटले गेले. पण विरोध होऊनही ही मालिका झी ने सुरुच ठेवली. पण आता ही मालिका लवकरच बंद होऊन त्याजागी नव्या रुपात ३ डी म्हणजेच दिल दोस्ती दुनियादारी प्रेक्षाकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हंटल जातय. कोकणातील नाईक कुटुंबावर आधारित असलेली ही मालिका 22 फेब्रुवारी पासून रसिकांच्या भेटीला आली. त्यातच काहींना या मालिकेतील कलाकारांची मालवणी भाषा रुचली नाही.

त्यामुळं ही मालिका आता लवकरच दी एंडकडे वळणार असून ती असून लवकरच ती रसिकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत नीलीमा हे कॅरेक्टर शास्त्रज्ञ दाखवलं गेलं आहे आणी आता हेच कॅरेक्टर लवकरच नाईक घरातील मंडळींचा भूतप्रेत यावर असलेला पगडा दूर करणार आहे. त्यांच्या मनातील सर्व काल्पनिक गोष्टी नीलिमा दूर करणार आहे असं सांगितलं जातंय. रात्रीस खेळ चाले मालिकेनं निरोप घेतल्यानंतर पुन्हा एकदा दिल दोस्ती दुनियादारी नवी ढंगात, नव्या रुपात रसिकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

--------------------