Sign In New user? Start here.

“डेली सोप ही रोज नव्याने केलेली एकांकिकाच असते - प्रशांत दामले ”

 
 

“डेली सोप ही रोज नव्याने केलेली एकांकिकाच असते - प्रशांत दामले ”

मराठी हिंदी, इंग्रजी भाषा कोणतीही असो उत्तम विनोदनिर्मिती करण्यासाठी टाइमिंग सेन्स अत्यंत महत्वाचा आहे, सब टीव्हीवरील ‘चंद्रकांत चिपलुनकर सीडी बम्बवाला ‘मालिकेसंदर्भात पत्रकार परिषदेत अभिनेते प्रशांत दामले बोलत होते. यावेळी अभिनेत्री कविता लाड देखील उपस्थित होत्या.

प्रशांत दामले म्हणाले की, ‘चंद्रकांत चिपलुनकर सीडी बम्बवाला’ ही माझ्या करिअरमधली पहिलीच टीव्ही मालिका करताना थोडस चुकल्यासारखं वाटत होत. डेली सोप ही रोज नव्याने केलेली एकांकिकाच असते. या मालिकेच्या माध्यमातून नवनवीन आव्हाने अनुभवयाला मिळाली. या मालिकेमधला देशसेवा करणा-या फायर-फायटरची भूमिका करताना अनुभवयाला मिळाली. या मालिकेमधला देशसेवा करणा-या फायर-फायटरची भूमिका करताना खूप धमाल आली आणि अशी भूमिका करायला मिळाल्याचा अभिमान देखील आहे. या मालिकेच्या माध्यमातून मला राष्ट्रीय स्तरवर अभिनय दाखविण्याची संधी मिळत असल्याचा जास्त आनंद आहे. विनोदी मालीकेमध्ये थांबत थांबत तेवढाच दर्जेदार विनोद आणि अभिनय करणं खूप अवघड आहे... तेच मी शिकून घेतलं आहे आणि आता मला ते जमायला लागलं आहे.

ते पुढे म्हणाले की, या मालिकेदरम्यान दहिहंडी, विहरीतून उंदराला बाहेर काढणे हे सीन करण्याकरिता मी काही स्टंटस सीन देखील केले आहेत. तसेच पुढील २ वर्षे तरी याच मालिकेवर लक्ष केंद्रित करणार आहे. या मालिकेचा केंद्र्बिंदू हा चंद्रकांत चिपलुनकर असून त्याच्या अवतीभवती असणारा त्याचा परिवार व त्याच्या कॉलनीतील पटेल, दुबे, चौधरी यांची देखील महत्वाची भूमिका आहे. हिंदी इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कसे आहात, काय करता यापेक्षा यांची देखील महत्वाची भूमिका आहे. इंडस्ट्रीमध्ये तुम्ही कसे आहात,काय करता यापेक्षा तुम्ही तुमचा परफॉर्मन्स कसा झाला आहे याला जास्त महत्व आहे ही मालिका सुरू झाल्यानंतर अनेक मराठी नाट्यरसिकांन अत्यंत आनंद आहे की मी आता राष्ट्रीय स्तरावर काम करतोय. पूर्वी अडीच तासांच्या पॅकेजमध्ये मी रसिकांसमोर यायचॊ आता मात्र २२ मिनिटांच्या शो मधून मी दिसणार आहे. त्यामुळे आठवडाभराच्या टप्यातटप्यात रसिकांना माझ्या विनोद अभिनयाचा आनंद अनुभवायला मिळणार आहे.

 

 

-----------