Sign In New user? Start here.

मराठी मालिकेत प्रथमच अंडरवॉटर चित्रीकरण

star pravaha new serial goth
मराठी मालिकेत प्रथमच अंडरवॉटर चित्रीकरण!!
LIGHT-HOUSE"
 
 

मराठी मालिकेत प्रथमच अंडरवॉटर चित्रीकरण

मराठी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह आणताना 'स्टार प्रवाह'नं त्याला भव्यता आणि तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. १० ऑक्टोबरपासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होत असलेल्या 'गोठ' या मालिकेचं काही चित्रीकरण अंडरवॉटर करण्यात आलं आहे. मराठी टीव्ही मालिकांमध्ये अंडरवॉटर चित्रीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

'गोठ' या मालिकेचा टीजर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे.'आता थांबायचं नाय' म्हणत नायिकेनं पुरुषसत्ताक पद्धतीला थेट आव्हान दिल्याचं या टीजरमधून दिसत आहे. त्यामुळे मालिका नक्कीच वेगळ्या आशयविषयावर भाष्य करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोकणाच्या पार्श्वभूमीवरची ही मालिका आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा टीजर मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहे. सोशल मीडियातून या टीजरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये मोठं नाव असलेल्या छायालेखक अभिषेक बासू यांच्या मार्गदर्शनाखाली अंडरवॉटर चित्रीकरण करण्यात आलं आहे. अभिषेक हा बर्फीसारखे उत्तम चित्रपट केलेल्या प्रख्यात दिग्दर्शक अनुराग बासूचा भाऊ आहे. 'गोठ' ही अभिषेकची पहिलीच मराठी मालिका आहे. फिल्मसिटीतील लेकमध्ये आणि एका स्विमिंग पूलमध्ये खास व्यवस्था करून हे चित्रीकरण झालं. अंडरवॉटर चित्रीकरण फार खर्चिक असतं. त्यासाठी खास व्यवस्था करावी लागते. मात्र, अभिषेकनं मांडलेली अंडरवॉटर चित्रीकरणाची कल्पना मालिकेची निर्मिती संस्था फिल्म फार्म आणि स्टार प्रवाह यांनीही 'आता थांबायचं नाही' या विचारानं उचलून धरली. आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, अंडरवॉटर चित्रीकरणातील तज्ज्ञ छायालेखकांनी काम केलं. भव्यता आणि उत्तम वातावरण निर्मिती करणारं छायांकन हे या मालिकेचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे.