Sign In New user? Start here.
tujhavachun karmena new serial
यश-जुईच्या लग्नानिमित्त कलर्स मराठीवर तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ
LIGHT-HOUSE"
 
 

‘यश-जुईच्या लग्नानिमित्त कलर्स मराठीवर तुझ्यावाचून करमेना मालिकेचा शुभारंभ

संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ मालिकेतील यश आणि जुई येत्या 27 जून रोजी विवाहबद्ध होणार आहे. सायंकाळी 7 ते 9 हा विवाहसोहळा कलर्स मराठी वाहिनीवर रंगेल.बहुचर्चित असलेला हा विवाह सोहळा देशमुखांच्या कार्यालयात होणार असून सोमण यांचे रुची केटरर्स केटरिंगची जबाबदारी पार पाडणार आहे. आता हे देशमुख आणि सोमण म्हणजे कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडेल तर त्याचे उत्तर कलर्स मराठी वाहिनीवर 27 जून पासून सोमवार ते शनिवार रोज रात्री 9 वाजता प्रसारित होणार्‍या ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून मिळेल.

स्वस्तिक मंगल कार्यालयाचे देशमुख यांचा मुलगा सिद्धार्थ आणि रुची केटरर्स च्या सोमण यांची मुलगी राधा या दोघांची ही गोष्ट आहे.श्रीकांत देशमुख आणि मधुकर सोमण हे दोघे खूप जुने मित्र. एकाच वाड्यात शेजारी शेजारी राहतात. सिद्धार्थची आई म्हणजेच वसुधा देशमुख ही खूप प्रेमळ आहे आणि मुलाच्या बाबतीत खूप हळवी आहे. सिद्धार्थ ची आत्या श्यामल आणि तिचा नवरा विलास हे दोघ देशमुखांकडेच राहतात आणि विलास त्यांच्या स्वस्तिक मंगल कार्यालयाचा मॅनेजर म्हणून काम करतो.

दोघेही प्रचंड स्वार्थी आणि अप्पलपोटी आहेत. राधाची लहान बहिण नुपूर खूप प्रक्टिकल आहे आणि रुची केटरर्सचे सगळे जमा-खर्च ती बघते. सिद्धार्थ आणि राधा यांचे नाते मात्र जरा वेगळे आहे. दोघांची कायम या न त्या कारणांवरून जुंपते. आपापल्या बाजूवर ठाम असणार्‍या दोघांना समजावणे म्हणजे खूपच अवघड. राधा ही अतिशय समंजस, हुशार आणि साधी मुलगी आहे. तर सिद्धार्थ मात्र खूपच द्वाड, मस्तीखोर आणि आपल्या मनाचा करणारा आहे. नाटकवेडा असलेल्या सिद्धार्थला थिएटरची खूप ओढ आहे. या दोघांचे नाते कसे फुलत जाते आणि याचे प्रेमात रुपांतर होते हे ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेत बघायला मिळणार आहे.

सिद्धार्ची भुमिका अभिजित आमकर साकारत असून राधा ची भूमिका साई घारपुरे साकारते आहे. आनंद काळे आणि कविता लाड बर्‍याच कालावधीनंतर श्रीकांत आणि वसुधा देशमुख भूमिकांमधून एकत्र काम करतांना दिसतील. विघ्नेश जोशी मधुकर सोमण ही भूमिका साकारत असून नुपुरची भूमिका रुचिरा जाधव साकारते आहे. अभिनेत्री पूर्णिमा तळवलकर म्हणजेच सिद्धार्थच्या आत्याच्या भूमिकेत दिसतील तर अभिनेता राजू बावळेकर विलासच्या भूमिकेत दिसतील.

बघायला विसरू नका 27 जूनला संध्याकाळी 7 वाजता यश-जुईचा विवाह सोहळा आणि रात्री 9 वाजता नवी मालिका ‘तुझ्यावाचून करमेना’ फक्त कलर्स मराठी वर.

--------------------