Sign In New user? Start here.

प्रेमाचं नातं उलगडून दाखवणारा ‘अप'

Up Disney movie now in marathi

रसलला कार्ल सुरक्षित पॅराडाईस वॅाटर फॉलवर उतरवतो का… या साऱ्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे 'अप' लहानांसोबत-मोठ्यांनाही गुंतवून ठेवणारा 'अप’ या चित्रपटाचा आस्वाद येत्या रविवारी १७ मे ला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’वर घेता येईल.

"Jai Malhar Khandoba Banu Vivah"

 
 

प्रेमाचं नातं उलगडून दाखवणारा ‘अप'

कार्ल आणि एलीची साहसी प्रेमकथा रेखाटणाऱ्या 'अप' या अॅनिमेटेड फिल्मची खास झलक लवकरच तुम्हाला झी टॉकीजवर अनुभवता येणार आहे.कार्ल, एली आणि रसल या तिघांच्या मैत्रीची, प्रेमाची ही कथा आहे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या कार्ल आणि एलीने लग्न करून आपली वेगळीच दुनिया उभारली आहे. परिस्थितीशी जुळवून घेत एकमेकांच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करणारे हे जोडपं पॅराडाईस वॅाटर फॉलला सहलीवर जाण्याचा निर्णय घेतात.

अचानक वयोवृद्ध एली अल्पशा आजाराने कार्लला सोडून देवाघरी जाते. आपल्या पत्नीच्या आठवणींनी कार्ल एकटा पडतो. त्या घराशी त्याच्या आणि एलीच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या असल्यामुळे कार्लला ते घर सोडायचे नाहीये. कार्लला ती आपल्यासोबत घरातच असल्याचा भास होत असतानाच स्काउट मधला मेरीट ब‌ॅच मिळवण्यासाठी वृद्धांना मदत करण्याकरिता रसल हा आठ वर्षांचा छोटा मुलगा त्याच्या आयुष्यात येतो. त्यातच कार्लच्या घराशेजारीच कन्सस्ट्रक्शन चालू झाल्याने कार्लला आपले घर सोडावं लागण्याची शक्यता आहे. आपल्या पत्नीला दिलेले सहलीचे वचन पूर्ण करण्यासाठी कार्ल राहते घरच साऊथ अमेरिकेच्या पॅराडाईस वॅाटर फॉल दिशेने उडवून नेतो हवेत उडवून नेण्यासाठी कार्ल हेलियमच्या फुग्यांचा आधार घेतो आणि रसल त्याला मदत करतो. फुग्यांच्या आधारे हवेच्या दाबाने घर वेगळ्याच ठिकाणी भरकटत जातं. कार्ल आपल्या पत्नीचे स्वप्न पूर्ण करू शकतो का…? रसलला कार्ल सुरक्षित पॅराडाईस वॅाटर फॉलवर उतरवतो का… या साऱ्याची चित्तथरारक गोष्ट म्हणजे 'अप' लहानांसोबत-मोठ्यांनाही गुंतवून ठेवणारा 'अप’ या चित्रपटाचा आस्वाद येत्या रविवारी १७ मे ला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता ‘झी टॉकीज’वर घेता येईल.

झी टॉकीज महाराष्ट्रातील मराठी चित्रपट रसिकांची खास जिव्हाळ्याची चित्रपट वाहिनी असून गेल्या काही वर्षातच या वाहिनीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी चित्रपटांचा मूल्यवान खजिना झी टॉकीज वाहिनीने जपला आहे. या चित्रपटांना रसिकांनी नेहमीच उत्तम प्रतिसाद दिला आहे. रसिकांनी दिलेल्या या भरभरून प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना झी टॉकीज ने मनोरंजनाचे अनोखे नजराणे पेश केले आहेत. झी टॉकीजच्या या नित्य नव्या प्रयत्नांना रसिकांनीही खूप उचलून धरले आणि म्हणूनच मनोरंजनाच्या कक्षा रुंदावण्यासाठी झी टॉकीजला सतत प्रोत्साहन मिळत आले. याच उत्साहातून अनेक गाजलेले चित्रपट, अनेक क्लासिक चित्रपटांचे महोत्सव, कॉमेडी चित्रपटांची जत्रा यासोबतच सिनेताऱ्यांच्या भेटी किंवा चित्रसृष्टीचे दैदीप्यमान सोहळे रसिकांना घरबसल्या अनुभवता आले.

 

 

--------------------