Sign In New user? Start here.

"झी गौरव २०१६ पुरस्कारांचं बिगुल वाजलं.

zee gaurav puraskar 2016
‘"झी गौरव २०१६ पुरस्कारांचं बिगुल वाजलं
LIGHT-HOUSE"
 
 

"झी गौरव २०१६ पुरस्कारांचं बिगुल वाजलं.

 

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अतिशय मानाच्या झी गौरव पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहिर करण्यात आली. मराठी चित्रपटांमध्ये गेल्यावर्षी आपल्या कामगिरीने वेगळा ठसा उमटविणा-या आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकणा-या अनेक चित्रपटांचा यात समावेश आहे. यातही प्रामुख्याने चुरस रंगणार आहे ती ‘डबल सीट’ , ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मितवा’ आणि ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ या चित्रपटांमध्ये. ‘डबल सीट’ चित्रपटाने २०, ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाने १६, ‘नटसम्राट असा नट होणे नाही’ चित्रपटाने एकूण १५ नामांकने मिळवत या स्पर्धेत रंगत आणली आहे. यासोबतच ‘मितवा’ने १५ आणि ‘संदूक’ चित्रपटाने १४ विभागात नामांकने मिळवत ही चुरस अजूनच वाढवली आहे. नुकत्याच एका शानदार सोहळ्यात मुंबईत या नामांकनाची घोषणा करण्यात आली. येत्या ११ मार्चला चित्रगौरव तर २२ मार्चला नाट्यगौरवचा शानदार पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

मराठी नाटकांमध्येही चुरस रंगणार

मराठी व्यावसायिक नाट्यसृष्टीमध्येही अशाच प्रकारचे विविध विषय यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांनीही त्यांना तेवढाच भरभरून प्रतिसाद दिला. यावर्षी नाट्यगौरव पुरस्कारासाठी प्रामुख्याने हा शेखर खोसला कोण आहे, शेवग्याच्या शेंगा आणि दोन स्पेशल या नाटकांमध्ये स्पर्धा रंगणार असून तिन्ही सांज, जाऊ द्या ना भाई आणि अ फेअर डील या नाटकांमुळे ही स्पर्धा देखील तेवढीच चुरशीची बनली आहे. तर प्रायोगिक रंगभूमीवरील मन की बात , एकूट समूह, एम एच 02 डी एल 5262, मोरू द सोल्युशन, चॉकलेटचा बंगला या नाटकांमधील स्पर्धा बघायला मिळणार आहे.

यावर्षीच्या झी चित्र गौरव पुरस्कारासाठी जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ या काळात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.

यावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि संजय मेमाने यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात सुषमा देशपांडे, रविंद्र दिवेकर आणि डॉ. अनिल बांदिवडेकर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी विजय केंकरे, संजय मोने आणि विवेक लागू यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.

--------------------