Sign In New user? Start here.
Zee Marathi Awards 2015
नऊचा पाढा नवरात्रीचा, अनोखी स्पर्धा
Zee Marathi Navratri Contest"
 
 

नऊचा पाढा नवरात्रीचा, अनोखी स्पर्धा

दुर्गामातेच्या पुजेचा हा सण आपण स्त्रीशक्तीचं प्रतिक म्हणून साजरा करतो. घटस्थापना ते दस-यापर्यंत सर्वत्र धामधूम असते ती देवीच्या जागराची. सुख, समृद्धी आणि मांगल्याच्या या सणात अनेक चांगल्या गोष्टींची सुरूवात, नव्या वस्तूंची खरेदी, व्यवहार या मुहूर्तावर करण्यात येतात. अशा या शुभमूहुर्ताच्या सणाप्रसंगी आता झी मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार आहे दररोज पैसे जिंकण्याची संधी ‘नऊचा पाढा नवरात्रीचा’ या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला सुरूवात होत असून यामध्ये ६.३० ते ११ या वेळेत दर अर्ध्या तासाला एक प्रश्न विचारण्यात येणार आहे. हा प्रश्न त्यावेळी सुरू असलेल्या कार्यक्रमाशी संबंधित असेल ज्यासाठी दोन पर्यायही देण्यात येतील. यातील अचूक उत्तर देणा-या भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे ९९९९ रूपयांचं बक्षिस.

नवरात्रीचा हा सण झी मराठीवर अनोख्या पद्धतीने साजरा होणार आहे. झी मराठीवरील विविध मालिकांमधून स्त्रीशक्तीचं आणि देवीच्या विविध रूपांचं दर्शन तर घडणार आहेच सोबतच ही स्पर्धाही रंगणार आहे. झी मराठीवर संध्याकाळी ६.३० ते रात्री ११ या वेळेत प्रसारित होणा-या मालिकांमध्ये म्हणजेच ‘होम मिनिस्टर’, ‘जय मल्हार’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘का रे दुरावा’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘अस्मिता’ आणि ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकांदरम्यान एक प्रश्न विचारला जाईल. हा प्रश्न त्या दिवशी प्रसारित होणा-या भागांशी संबंधित असेल. नवरात्रीमध्ये १३ ते २१ ऑक्टोबरदरम्यान दर दिवशी असे ९ प्रश्न विचारले जातील ज्याच्या प्रत्येक अचूक उत्तरासाठी प्रेक्षकांना ९९९९ रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड होणार असून त्यांच्या नावांची घोषणा दस-याच्या दिवशी झी मराठीवरून करण्यात येईल.

--------------------