Sign In New user? Start here.

रविवारी "टाइमपास" करण्यासाठी येतोय "टाइमपास"

Zee Marathi World TV Premiere - Timepass Movie

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय चित्रपट लेखक आणि दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांच्या कामाची दखल आता अमेरीकेत स्थायिक असलेल्या मराठी माणसांनी घेतली आहे

"Zee Marathi World TV Premiere - Timepass Movie"

 
 

रविवारी "टाइमपास" करण्यासाठी येतोय "टाइमपास"

रविवार या शब्दातच एका अर्थाने टाइमपास हा शब्द दडलेला असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रविवार म्हणजे हक्काची सुट्टी आणि टाइमपास करण्यासाठीचा हक्काचा दिवस. प्रत्येक रविवार हा तसा खासच असतो पण २८ सप्टेंबरचा रविवार हा जरा जास्तच स्पेशल असणार आहे कारण या दिवशी साजरा होणार आहे “वर्ल्ड टाइमपास डे” ज्यासाठी निमित्त असणार आहे यावर्षीचा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट “टाइमपास”. यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत यशाचे सर्व विक्रम मोडणारा आणि नवे विक्रम रचणारा “टाइमपास” हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रविवारी रात्री ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.

“आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ”... “चला हवा येऊ द्या”… “नया है वह” सारखे तुफान धमाल संवाद, “मला वेड लागले प्रेमाचे”, “दाटले रेशमी धुके” सारखी रोमॅंटीक गाणी, दगडु-प्राजक्ताची इनोसंट लव्ह स्टोरी , प्राजुच्या वडील लेलेंचा त्याला विरोध, त्यातून येणारी जुदाई , प्रेमाची परिक्षा असा सगळा मसाला या चित्रपटात होता. टाइमपास म्हणून सुरू झालेल्या प्रेमात दगडू सिरीयस होतो आणि त्यातून मिळणा-या आनंदाची आणि दुखःचीही कथा म्हणजे टाइमपास हा चित्रपट. वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवली होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या चित्रपटाचे फॅन बनले होते. चित्रपटाचे संवाद, गाणी सोशल नेटवर्क साइट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. यात दगडूची भूमिका प्रथमेश परबने तर प्राजक्ताची भूमिका केतकी माटेगावकरने साकारली होती. याशिवाय वैभव मांगले, भाऊ कदम, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ सारखे सुपरहीट चित्रपट देणा-या रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.

झी मराठीवरून या चित्रपटाचा आता वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेंव्हा अनेकांनी चित्रपटगृहांत जाऊन तो बघितला होता. याशिवाय हा चित्रपट अनेकवेळा बघणा-या प्रेक्षकांची संख्याही खूप जास्त होती. ज्यांनी तेव्हा बघितला त्यांना अजून एकदा आनंद देण्यासाठी आणि ज्यांना त्यावेळी बघता नाही आला अशा प्रेक्षकांसाठी ही खास मेजवानी असणार आहे. झी मराठीचे प्रेक्षक केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही आहेत. अशा सर्व मराठी प्रेक्षकांसाठी टाइमपासचा टीव्ही प्रिमीयर हा खास नजराणा ठरणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. टाइमपासचा हा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.

 

--------------------