Sign In New user? Start here.
zee talkies present yad lagla
झी टॉकीजवर ‘याड लागलं’ची झिंग
LIGHT-HOUSE"
 
 

झी टॉकीजवर ‘याड लागलं’ची झिंग

पुणे फेस्टिवलमध्ये झी टॉकीज प्रस्तुत ‘याड लागलं’ या भन्नाट कार्यक्रमाची झिंग उपस्थित पुणेकरांनी नुकतीच अनुभवली. झिंगाट नृत्यांचा जलवा आणि खळखळून हसवणाऱ्या स्कीटसने रंगलेल्या सोहळ्याने पुणे फेस्टिवलची रंगत चांगलीच वाढवली.

या कार्यक्रमाची सुरुवात मृण्मयी देशपांडे हिच्या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर अतुल तोडणकर, शशिकांत केरकर, स्वाती देवल, नम्रता आवटे, प्रकाश, नितीन यांनी सादर केलेल्या गण-गवळण, बतावणीने तसेच मेघा घाडगे व दिपाली सय्यद यांच्या लावणी जुगलबंदीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. सागर कारंडे, कुशल बद्रिके, पंढरीनाथ कांबळे, मेघा घाडगे, दिपाली सय्यद यांनी सादर केलेल्या सैराटराव विरुद्ध झिंगाटराव या स्कीटनेही प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. संस्कृती बालगुडे व अनिकेत विश्वासराव यांच्या प्रेमगीताच्या नृत्याविष्काराने रसिकांची मने जिंकली. तसेच विशाखा सुभेदार, सागर कारंडे आणि कुशल बद्रीकेने रंगवलेल्या ‘साक्षी मलिक’, ‘रजनीकांत’ या प्रहसनानेसुद्धा चांगलीच धमाल उडवली. मानसी नाईकच्या ‘मल्हारी’ तसेच सोनाली कुलकर्णीच्या ‘काशीबाई’ व संस्कृती व सड्रीक डीसुझाच्या ‘टॅालीवूड’ या लाजबाव नृत्य परफॉर्मन्सनी सोहळ्यात रंगत आणली. या कार्यक्रमाच धम्माल निवेदन विनोदी अभिनेते पंढरीनाथ कांबळे व पूर्णा यांनी केलं.

‘एक से बढकर एक’ अशा कलाविष्कारांनी रंगलेला हा सोहळा झी टॅाकीजच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी असणार आहे. रविवार २ ऑक्टोबरला दुपारी १२.०० वा.आणि सायंकाळी ६.०० वा. ‘याड लागलं’ या कार्यक्रमाचा आस्वाद प्रेक्षकांना झी टॅाकीजवर घेता येणार आहे.