Sign In New user? Start here.
zee talkies contest
झी टॉकीज' वर १३ सप्टेंबरपासून ‘दाबा बोट मिळेल नोट’ नवीन कॉन्टेस्ट
3d rock concert at pune"
 
 

'झी टॉकीज' वर १३ सप्टेंबरपासून ‘दाबा बोट मिळेल नोट’ नवीन कॉन्टेस्ट

'झी टॉकीज' वाहिनीने नेहमीचं आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याचं काम 'झी टॉकीज' वाहिनीने आजवर केलं आहे. अशीच एक भन्नाट संकल्पना घेऊन आयुष्य बदलण्याची संधी 'झी टॉकीज' वाहिनी देणार आहे. ‘दाबा बोट मिळेल नोट’ ही नवीन कॉन्टेस्ट 'झी टॉकीज' वाहिनी घेऊन येणार आहे. या संधीमुळे प्रत्येकाची स्वप्नपूर्ती पूर्ण होऊ शकेल.

१३ सप्टेंबर पासून सुरु होणारी ही कॉन्टेस्ट प्रश्‍नोत्तरावर आधारित असून ११ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. सोमवार ते शनिवार सायं ७.०० ते रात्री १२.०० व रविवारी दुपारी १२ ते रात्री १२.०० यादरम्यान 'झी टॉकीज' वर दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांदरम्यान चित्रपटासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासठी दोन पर्याय असतील जिंकण्यासाठी योग्य पर्यायावर फक्त जास्तीत जास्त फ्री मिस्ड कॉल द्यायचा आहे.

दर दिवशी या स्पर्धेतून मेगा विजेते घोषित करण्यात येणार आहेत. मेगा विजेत्याप्रमाणे अन्य विजेत्यांची निवड सुद्धा करण्यात येणार आहे. मेगा विजेत्यांना ९९९९ हजार रुपये त्या नंतरच्या विजेत्यांना ५००० व १००० रुपयापर्यंतची बक्षीस दिली जाणार आहेत. विजेत्यांची नावे वेबसाईट,प्रिंट अशा माध्यमातून जाहीर करण्यात येतील. विचारल्या जाणा-या प्रश्नांची अचूक उत्तरं देणारे लकी स्पर्धेक वरील बक्षिसासांठी पात्र ठरतील.

टाईमपास, दृश्यम चित्रपटानंतर तरूणाईचा लाडका प्रथमेश परब हा 'झी टॉकीज' वाहिनीवरील ‘दाबा बोट मिळेल नोट’ या कॉन्टेस्टसाठी मतदान करण्याचे आवाहन प्रेक्षकांना करणार असून आपल्या बोटाचा वापर करून नोट कशी मिळवायची याचे जबरदस्त फंडे प्रथमेश प्रेक्षकांना सांगणार आहे. 'झी टॉकीज' बरोबर काम करण्याचा अनुभव नेहमीच चांगला राहिला आहे. 'झी टॉकीज' ची ही नवीन प्रेक्षकांना नक्कीचं आनंद देईल असा विश्वास प्रथमेश परबने बोलून दाखवला.

'झी टॉकीज' दरवर्षी अनोख्या स्पर्धा आयोजित करते. या स्पर्धांना प्रेक्षकांनी नेहमीचं उचलून धरलं आहे. ‘दाबा बोट मिळेल नोट’ या कॉन्टेस्टमध्ये विचारण्यात येणारे प्रश्‍न मनोरंजनात्मक राहणार असल्याने प्रेक्षकांना ही कॉन्टेस्टसुद्धा निश्‍चितच आवडेल.

--------------------