Sign In New user? Start here.

ashish chaughules message

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

आशिष चौघुले (अध्यक्ष,बृहन् महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका) यांचे मनोगत

   मंडळी नमस्कार,

   बृहन् महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष या नात्याने तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो.
कै. विष्णु वैद्य, कै. शरद गोडबोले, आणि सौ. जया हुपरीकर यांच्या पुढाकाराने ३१ वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थापन केलेल्या बृहन् महाराष्ट्र मंडळाला एक जाज्वल्य आणि दैदिप्यमान परंपरा आहे. गेल्या ३१ वर्षांत महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, चालीरिती इथे उत्तर अमेरिकेत बी.एम.एम. ने जोपासली आणि वाढवली. महाराष्ट्रातून आलेल्या बुध्दिजीवी लोकांनी अमेरिकेलाच आपली कर्मभूमी मानत इथे आपलं स्वतःचं स्थान प्रस्थापित केलं. करमणुकीची, जिव्हाळ्याची, संस्कृतीची साधनं शोधली आणि त्यातूनच बी.एम.एम. अधिवेशनांचा जन्म झाला. जगभराच्या कानाकोपर्याीत राहूनही मराठी संस्कृतीची नाळ जोडणार्या सर्वजणांसाठी बी.एम.एम. अधिवेशन हे एक समान व्यासपीठ असेल. बाळ महाले आणि त्यांच्या न्यू इंग्लंड मंडळाच्या सहकार्यांकच्या कुशल व्यवस्थापनाखाली, बी.एम.एम.चे १६ वे अधिवेशन प्रॉव्हिडन्स, र्होइड आयलंड येथे होणार आहे. 'ऋणानुबंध' किंवा 'connections' ही मध्यवर्ती कल्पना ठेवूनच पाचही खंडातल्या मराठी संस्कृतीच्या पाईकांचा यंदाच्या अधिवेशनात सहभाग असेल. Thomas Friedman च्या 'World is flat' संकल्पनेप्रमाणे सर्व जग जवळ येत आहे. या Globalization च्या युगात काळाची पावलं ओळखून या मराठीने आपलं रूप थोडं बदललंय. या मराठीच्या, संस्कृतीच्या स्थित्यंतराच्या वार्याेसमोर उभं राहून मोडून न पडता ते Global वारे आपल्या शिडात भरून, तारु नव्या जोमाने सागरात लोटू या!

ashish chaughules message

   कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आदरातिथ्य यांच्या अनोख्या सादरीकरणानंतर "झाले बहु, होतील बहु, परंतु या सम न हा" असे विचार तुमच्या मनात घोळतील याचे ग्वाही देतच माझे तुम्हा सर्वांना या बी.एम.एम. च्या आनंदयात्रेत सहभागी होण्याचे अगत्याचे आमंत्रण..

   कळावे लोभ असावा,
आपला,

   आशिष चौघुले
अध्यक्ष, बृहन् महाराष्ट्र मंडळ, उत्तर अमेरिका
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. (302) 559 -1367