Sign In New user? Start here.

‘भारत कधी कधी माझा देश आहे’ चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम

bhart kadhi kadhi maza desh aaahe

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

‘भारत कधी कधी माझा देश आहे’ चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम

Bharat kadhi kadhi maza desh ahe

  चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक, कवी, वक्ते, अशा बहुरंगी भूमिका पार पाडत, मराठी साहित्य क्षेत्रात आणि सामाजीक क्षेत्रात बहुमुल्य योगदान देणारे, प्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांच्या ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या कार्यक्रमाला नुकतेच २५ वर्ष पूर्ण झालेत. ‘सामना’, ‘सर्वसाक्षी’, ‘सुर्वांत’ असे वेगळ्या पठडीतले चित्रपट देऊन ते यशस्वीही झालेत. या चित्रपटांप्रमाणे ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ ह्या कार्यक्रमालाही घसघशीत यश मिळालं. देशातच नव्हे तर देशाबाहेरही श्रोत्यांनी या कार्यक्रमाला अक्षरश: डोक्यावर घेतलंय. अचानकपणे डोक्यात आलेल्या या नावाचा(भारत कधी कधी माझा देश आहे) इतका मोठा कार्यक्रम होईल आणि तो २५ वर्ष लोकांच्या मनावर राज्य करेल असं रामदास फुटाणे यांनाही कधी वाटलं नसेल. ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ या त्यांच्या व्यंगकवितांच्या कार्यक्रमाला ७ सप्टेंबर २०११ रोजी २५ वर्ष पूर्ण झालीत. आणि हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइट येथे पार पडला. त्यानिमित्ताने एक स्मरणिका काढण्यात आली.

   ‘सामना’ चित्रपटामुळे महाराष्ट्रात फुटाणे यांचं नाव चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे सोलापूरच्या उद्योग बॅंक कर्मचारी संघटनेच्या गणेशोत्सवाचे व्याख्यानाचे निमंत्रण त्यांना मिळाले. त्यावेळी व्याख्यानाचा विषय ‘भारत कधी कधी माझा देश आहे’ असा ठरवण्यात आला आणि या विषयावर ते ७ सप्टेंबर १९८६ साली जवळपास ५० मिनिटे बोलले. आणि सुरू झाला प्रवास या नव्या कथा-कथनाचा. हा कार्यक्रम इतका प्रसिद्ध झाला की, पुढे त्याच्या कॅसेट्स आणि डिव्हीडी सुद्धा काढण्यात आल्यात.

   काही दिवसातच या कार्यक्रमाने चांगलीच धूम केली. गावोगावी रामदास फुटाणे आणि अशोक नायगांवकर यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रणे येऊ लागलीत. महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिका, कॅनडा, लंडन, मस्तक, दुबई, दोहा, सिंगापूर अशा परदेश वा-याही त्यांनी या कार्यक्रमासाठी केल्यात. आणि आता या कार्यक्रमाला तब्बल पंचवीस वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने डेट्रॉइट च्या मराठी मंडळाने एक खास कर्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात रामदास फुटाणे यांचा सन्मानही करण्यात आला.

   ११ सप्टेंबर २०११ ला ‘भारत कधी कधी माझा देश आहे’चा कार्यक्रम ठेवण्यात आला. ज्याला रामदास फुटाणे यांच्यासमवेत कवी अशोक नायगांवकर यांनाही बोलवण्यात आले होते. ३०० च्यावर श्रोते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाने जवळपास अडीच-तीन तास श्रोत्यांना खुर्चीवर खिळवून ठेवले होते. असा वात्रटिका आणि कवितांचा इतकी वर्षे चालू असलेला हा एकमेव प्रयोग असावा. एवढी वर्ष असा कार्यक्रम चालू ठेवणं सोपं नाही. पण या कार्यक्रमात फुटाणे यांनी सतत काळानुरूप बदल केले आहेत. त्यामुळे ते त्या त्या काळातील लोकांना आवडणार नाही असं होऊच शकत नाही. ‘सामना’चित्रपट तयार करण्यासाठी त्यांच्यावर झालेलं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी या कार्यक्रमाची सुरवात केली. आणि आज हा कार्यक्रम इतका प्रसिद्ध झालाय. हाच रौप्य महोत्सवी कार्यक्रम महाराष्ट्र मंडळ डेट्रॉइट येथे ठेवण्यात आला होता. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या स्मरणिकेत परदेशातील आणि देशातील अनेक मान्यवरांनी रामदास फुटाणे यांच्याविषयी अनेक आठवणी सांगितल्या आहेत.