Sign In New user? Start here.

bhimsen joshi pic publish

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

स्वराधिराज पंडितजींच्या छायाचित्राचें "सवाई"मध्ये होणार प्रकाशन

  पं. भीमसेन जोशी यांचे संगीतविषयक विचार आणि गेल्या २५ वर्षांतील त्यांची दुर्मिळ छायाचित्रे 'स्वराधिराज भीमसेन' या पुस्तकात एकत्र येणार असून,१९८४ पासून २००७ पर्यंतच्या कालावधीत सवाईच्या स्वरमंचावर पंडितजींची तब्बल दोन हजारांहून अधिक छायाचित्रे काढली. यातील निवडक ५० छायाचित्रांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. आज सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्याचे प्रकाशन केले जाणार आहे.

   पंडितजींच्या गानमुदा आणि त्यांचे सांगीतिक विचार यांची सांगड घालून या पुस्तकाची निर्मिती केली आहे. या पुस्तकातील पंडितजींचे विचार मराठीसह इंग्रजी आणि कन्नडमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहेत,' अशी माहिती प्रसिद्ध फोटोग्राफर सतीश पाकणीकर यांनी दिली. 'कॉफी बुक' स्वरूपातील या पुस्तकाची संकल्पना आणि निर्मिती पाकणीकर यांनीच केली असून, अॅड्रॉईट पब्लिकेशनतर्फे ते प्रकाशित केले जाणार आहे. त्यांच्यावरील विविध पुस्तकांतून आणि दूरदर्शन व आकाशवाणीवरील मुलाखतींमधून त्यांनी व्यक्त केलेले संगीतविषयक विचारही यात समाविष्ट करण्यात आले आहेत,' असे पाकणीकर यांनी स्पष्ट केले.मूळ बाराशे रुपये किंमतीचे हे पुस्तक सवाई गंधर्व महोत्सवादरम्यान रसिकांना नऊशे रुपयांत उपलब्ध होणार आहे.