Sign In New user? Start here.

bmm 2013 programm

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

सौमित्र आणि वैभव जोशींच्या कवितांची मेजवानी बीएमएम अधिवेशनात

   सौमित्र (किशोर कदम) आणि कवि वैभव जोशी आपली कविता बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ)च्या जुलै २०१३ मधे प्रॉव्हिडन्स, र्‍होड आयलंड इथे होणार्‍या अधिवेशनात सादर करणार आहेत. बी.एम.एम.च्या या १६ व्या अधिवेशनात ते 'एक मी आणि एक तो' या कार्यक्रमातून आपल्या कविता रसिकांना ऎकवणार असून रसिकांशी संवाद सुद्धा साधणार आहेत. सोबतच प्रसिध्द गझलगायक दत्तप्रसाद रानडे या दोघांच्याही कविता सादर करतील तर संगीतसंयोजन कमलेश भडकमकर करणार आहेत.

   या दोन कवींचे, त्यांच्या कवितेचे एकमेकांशी असलेले नाते 'एक मी आणि एक तो' या कार्यक्रमातून उलगडले जाते. एकमेकांच्या कवितांना पूरक आणि त्यांचे अर्थ पुढे नेणार्‍या तसेच अस्सल जीवनानुभव व्यक्त करणार्‍या कवितांची ही मैफल महाराष्ट्रात अनेक वेळा रंगली आहे. आता अमेरिकेतल्या रसिकांना बी.एम.एम.च्या व्यासपीठावर पहिल्यांदाच या मैफिलीचा आनंद लुटता येणार आहे.