Sign In New user? Start here.

चाहूल बीएमएम अधिवेशन २०१३ची

bmm convention 2013

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

चाहूल बीएमएम अधिवेशन २०१३ची

  भारताबाहेरील मराठी लोकांचं अस्तित्व जपण्यासाठी, मराठी भाषा, संस्कृतीचा विकास करण्यासाठी बृह्नमहाराष्ट्र मंडळ सतत कार्यरत असतं. त्यासाठी दर दोन वर्षांनी एक अधिवेशन घेतल्या जातं. २०११ मद्ये शिकागो येथे पार पडलेल्या अधिवेशनानंतर आता जुलै २०१३ साली होणा-या अधिवेशनाचं रणशिंग फुंकण्यात आलं आहे. या अधिवेशनाचं ऑफिशिअल अनाऊंन्समेंट करण्यात बृह्नमहाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. आशिष चौघुले यांच्याकडून करण्यात आले. यावेळी हे अधिवेशन ऎतिहासिक -होडे इसलॅंड कॉन्व्हेंशन सेंटर, प्रॉव्हीडेन्स येथे पार पडणार आहे. नुकताच याबाबतचा करार बीएमएम अध्यक्ष आशिष चौघुले, बाळ महाले आणि शहराचे मेअर अॅणन्जेल तॅवेरा यांच्यासमोर करण्यात आला.

BMM
BMM

   दर दोन वर्षांनी होणा-या अधिवेशात दरवेळी प्रेक्षकांना रंगीबेरंगी कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळत असते. सगळीकडे तब्बल चार दिवस उत्सवाचं वातावरण असतं. सर्व जसं मराठीमय झालेलं असतं. यावेळी असंच वेगळं आणि चांगलं अधिवेशन होईल याकडे नॉर्थ अमेरिकेतील आणि वेगवेगळ्या देशातील मराठी जनांचे लक्ष लागले आहे.