Sign In New user? Start here.

कॉसमॉस बॅंक आणि बीएमएमचे ॠणानुबंध

bmm convention mega sponcer cosmos bank

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

कॉसमॉस बॅंक आणि बीएमएमचे ॠणानुबंध

   आज ग्लोबलायझेशनच्या युगात महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक सातासमुद्रापार नोकरी -व्यवसाय करण्यासाठी जातात. आपली संस्कृती, आपले लोक आणि घरापासून त्यांना दूर तिकडे रहावं लागतं. मात्र त्यांचं आपल्या मातीशी असलेलं नातं कधीच कमी होत नाही. मराठी लोक आणि मराठी संस्कॄती यांच्यात दुवा म्हणून गेली कित्येक वर्ष उत्तर अमेरिकेतील बॄह्नमहाराष्ट्र मंडळ हे मराठी संस्कृती, भाषा, साहित्य आणि कला यांची जोपासना करीत आहेत. या मंडळातर्फ़े दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये अधिवेशन घेतल्या जातं. या अधिवेशनात मराठी संस्कृतीचे जतन करणारे विविधरंगी कार्यक्रम सादर केले जातात. सोबतच विचारांची देवाण-घेवाण केली जाते. त्यासाठी हजारो मराठी बांधव एकत्र येतात. या अतिशय चांगल्या आणि मराठीच्या विकासासाठी चालणा-या उपक्रमाला अनेक संस्थांचे सहकार्य लाभतं. त्यानुसार यावर्षी प्रॉव्हिडन्स शहरात होणा-या या बीएमएम अधिवेशन २०१३ ला ‘कॉसमॉस’ या बॅंकेने मेगा स्पॉन्सर बनून सहकार्य केले आहे. यामाध्यमातून कॉसमॉस बॅंक आणि बीएमएमच्या ॠणानुबंधाची सुरवात झाली आहे.

   सहकार क्षेत्रामध्ये झपाट्याने घोडदौड करणा-या दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बॅंक य मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅंकेने अनिवासी भारतीयांसाठी खास योजना आखल्या असून या योजना बॅंकेच्या वर्धापनदिनापासून(१८ जानेवारी २०१३) ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बृह्नमहाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन जुलै २०१३ मध्ये होणार असून या अधिवेशनाला कॉसमॉस बॅंक ही मेगा स्पॉन्सर असून या स्पॉन्सरशिपची आणि नवीन योजनांची घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी बॅंकेचे प्रभारी अध्यक्ष कॄष्णकुमार गोयल, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत पोंक्षे, सहव्यवस्थापक संचालक सुहास गोखले, तसेच बॄह्नमहाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष आशिष चौघुले आणि बीएमएम २०१३ अधिवेशनाचे कन्व्हेनर बाळ महाले हेही उपस्थित होते.

   गोयल पुढे म्हणाले, "कॉसमॉस बॅंकेला रिझर्व्ह बॅकेकडून सन २००७ मध्ये विदेश विनिमय व्यवहार परवाना प्राप्त झाला आहे. बॅंकेचे तीन राज्यांत सहा परकीय चलन देवाण-घेवाण करणारी केंद्र कार्यरत असून जगभरातील शंभरपेक्षा अधिक बॅंकांच्या सहकार्याने कॉसमॉस बॅंक परकीय चलनासंबंधी व्यवहार करीत आहे."

   यावेळी बॅंकेचे श्री. जयंत शाळीग्राम म्हणाले की, बीएमएम अधिवेशनाला स्पॉन्सरशिप देऊन सातासमुद्रापार असलेल्या मराठी मनांच्या जवळ जाण्याचा आमचा प्रयत्न असून मराठी संस्कृतीच्या विकासासाठी मराठी लोकांना एकत्र आणणा-या या अधिवेशनाला आम्ही हातभार लावतोय. कॉसमॉस बॅंकेने मराठी लोकांसाठी नेहमी पुढाकार घेतला असून अनिवासी भारतीयांना सुद्धा आमच्या सेवा-सुविधांचा फायदा घेता यावा यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. बीएमएम सोबत जुळलेले आमचे हे ऋणानुबंध असेच वॄद्धींगत व्हावे हीच इच्छा आहे, असे ते म्हणाले."

   बीएमएमचे अध्यक्ष आशिष चौघुले यावेळी म्हणाले की, "नॉर्थ अमेरिकेतल्या वेगवेगळ्या मंडळांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी या मंडळाच्या अधिवेशनाची सुरवात झाली. महाराष्ट्रात होतात तेवढे फार अधिवेशने तिकडे होत नाहीत त्यामुळे बीएमएमच्या या दर दोन वर्षांनी होणा-या अधिवेशनाला मराठी नागरीकांचा जोरदार प्रतिसाद मिळतो. या आमच्या उपक्रमात कॉसमॉसने सहभाग घेतल्याने आम्हाला खूप मदत झाली आहे. आमचे हे नाते फक्त व्यवसायासाठीच नाहीतर हॄदयाशी जुळले आहे." बीएमएमबद्दल माहिती देतांना ते पुढे म्हणाले की, "बीएमएम मंडळातर्फ़े आम्ही फक्त अधिवेशनच भरवत नाहीतर अनेक उपक्रम सुद्धा राबवतो. मराठी लोकांना बिझनेसची माहिती मिळण्यासाठी ‘बिझनेस एक्स्पो’, ‘२७ शहरांमध्ये मराठी शाळा’ असेही उपक्रम आम्ही चालवतो. मराठी तरूणांसाठी ‘मैत्र’ सारखी संस्था सुद्धा चालवतो. असे ते म्हणाले."

   तसेच बीएमएम अधिवेशनाचे कन्व्हेनर बाळ महाले म्हणाले की, "५ ते ७ जुलै दरम्यान ‘प्रॉव्हीडन्स’ शहरात होणा-या या अधिवेशनासाठी आम्ही अतिशय उत्साही असून अधिवेशनाला येणा-या सर्वांचे स्वागत करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अधिवेशनासोबतच भारतातील आणि अमेरिकेतील वेगवेगळ्या व्यक्तीमत्वांना एकत्र आणून विचारांची देवाण-घेवाण कशी करता येईल याकडेही आम्ही लक्ष देत आहोत. यासाठी शिक्षणाचं माहेरघर असलेल्या ‘बॉस्टन’ या प्रसिद्ध शहरात आम्ही एक शैक्षणिक चर्चासत्र आयोजिक केले आहे. ज्यात भारतातील ३२ कॉलेजेस आणि अमेरिकेतील २५ कॉलेज सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रातून शैक्षणिक विचार मांडले जाणार आहे."

   * कॉसमॉसच्या अनिवासी भारतीयांसाठी नवीन सुविधा *

   * ‘कॉस्मो एफसीएनआर(बी) प्रिमियम’ या योजनेचा कालावधी एक वर्ष एक दिवसाचा असून ही योजना परकीय चलनामध्ये उपलब्ध आहे. ‘कॉस्मो एफसीएनआर (बी) डबल बोनान्झा’ या योजनेचा कालावधी एनआरई खात्यातील गुंतवणूकीसह एकूण दोन वर्षे एक दिवस असा आहे. "कॉस्मो मॅक्स ईल्ड एनआरओ डिपॉझिट’ ही योजना डीटीएए अंतर्गत कर प्रणालीनुसार कर आकारणीशी निगडीत करण्यात आली आहे. ‘कॉस्मो एफसीएनआर(बी) डिपॉझिट’ ही सध्याची योजना आता नव्या स्वरूपात ग्राहकांना उपलब्ध होणार असून ही योजना देखील परकीय चलनामध्ये उपलब्ध आहे. या योजनेचा कालावधी एक ते पाच वर्षे असा राहणार आहे.

   या योजनांबरोबरच अनिवासी भारतीयांना बॅंकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी एक विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून अनिवासी भारतीयांना पासपोर्ट, विदेशी प्रवास, विमा, औषधोपचार, लग्नसमारंभ या संदर्भातील सेवा-सुविधा देणा-या विविध संस्थांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच दिवाळी, गणेशोत्सव, नाताळ आदि विविध सणांनिमित्त पाठविल्या जाणा-या भेटवस्तूंसाठीच्या कुरिअर सेवांची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त कॉसमॉस बॅंकने इंटरनेट बॅंकीक सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली आहे.