Sign In New user? Start here.

bmm president ashish chaughule

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

बीएमएम अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आशिष चौघुले विजयी

  नॉर्थ अमेरिकेतील मराठी लोकांना एकत्र आणणा-या बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १५ अधिवेशन नुकतेच शिकागो येथे मोठ्या जल्लोषात पार पडले. अनेक रंगीबेरंगी कार्यक्रमांनी तीन दिवस हे अधिवेशन चांगलेच रंगले. प्रेक्षकांनीही कार्यक्रमांचा आणि महाराष्ट्रीयन पदार्थांचा चांगलाच आस्वाद घेतला. कार्यक्रमांबरोबरच या अधिवेशनाचं आणखी एक महत्व म्हणजे दर दोन वर्षांनी भरविल्या जाणा-या या अधिवेशनात बीएमएमच्या अध्यक्षांची निवड केली जाते. यावेळी या पदासाठी शर्यतीत असलेल्या तीन उमेदवारांपैकी डेलावेरच्या मराठी मंडळाचे अध्यक्ष श्री.आशिष चौघुले यांची बीएमएमच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे.

   आशिष चौघुले यांनी आत्तापर्यंत बीएमएमच्या अनेक महत्वाच्या जबाबदा-या पार पाडल्या असून बीएमएमचे treasurer म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. तसेच भारतीय कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणे, टॅलेंन्ट ट्रान्सफर कार्यक्रम, बीएमएमचा लोगो तयार करणे तसंच बीएमएमच्या संकेतस्थळाचा विकास करणे आणि बीएमएमच्या विविध उपक्रमांना प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवणे तथा त्यांना प्रसिद्धी देणे, NAME ची स्थापना अशी अनेक महत्वाची कामे केली आहेत. चौघुले यांनी या कामांबरोबर सांस्कृतीक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. त्यात अमेरिकेत लोकप्रिय ठरलेल्या ‘माय मराठी’ या लोकसंगीताच्या कार्यक्रमाची सुरवात त्यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे ते लेखक, निवेदक, सुत्रधार आहेत. याशिवाय ‘खेळ मांडियला’, ‘स्वर पश्चिमेचे’, ‘दास्तान, ‘आम्ही मराठी’, ‘कल्याण रंग’, ‘सुरमयी शाम’ असे कितीतरी कार्यक्रम त्यांनी बसवले आहेत.

   बीएमएमच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर काय करायचे, कसे करायचे याचा आराखडाही त्यांनी व्यवस्थितरित्या तयार केलेला आहे. त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टांबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मी स्वत:ला क्रॉस ओव्हर कम्युनिटीचा सदस्य मानतो. त्यामुळे ज्याप्रमाणे जुन्या बीएमएमच्या Values मी जाणतो. तसाच मी बदलत्या Demographics ला आवडणा-या गोष्टींचीही मला चांगली कल्पना आहे. आणि यांची सांगड कशी घालायची याची मला चांगली जाणीवही आहे. तसंच ६० -७० च्या दशकात आलेले महाराष्ट्रीयन जनरेशन सध्या रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं म्हातारपण आपण कुणीच नाकारू शकत नाही त्यामुळे त्यांच्या अनेक समस्यांचे आधीच आपण निरसन करू शकतो. त्यांच्यासाठीही अनेक उपक्रम राबविता येतील. तरूणांसाठी असलेल्या ‘मैत्र’मध्येही मला काम करायला आवडेल. महाराष्ट्राच्या पर्यटनाचा उत्तर अमेरिकेत पाहिजे तसा प्रचार अजून झालेला नाहीये. तिथल्या डोंगरद-या, ऎतिहासिक किल्ले, नैसर्गिक सौंदर्य यांबाबत इकडे कुणाला फारशी माहीती नाहीये. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं उत्तर अमेरिकेत जर महाराष्ट्राच्या पर्यटनासाठी मला ब्रॅण्ड अॅथम्बेसेडर म्हणून काम करायला आवडेल. यात महाराष्ट्राच्या पर्यटनाचा आणि बीएमएमचा फायदा होईल. मला वाटतं अमेरिकेत टॅलेन्टची काही कमी नाही. भारतातून आपण नेहमी कार्यक्रम आणतो. त्यासोबतच जर प्रत्येक मंडळानं वर्षभरातून किमान दोन कार्यक्रम जरी लोकल टॅलेन्टचे केले तर मला वाटतं त्यांच्या कला-गुणांचंही चिज होईल. तसंच कलाकारांचा सहभाग वाढेल, दळणवळणही वाढेल असं मला वाटतं. तसेच गेल्या तीन अधिवेशनांचा अनुभव असल्याने २०१३ च्या अधिवेशनाच्या प्लॅनिंगमध्ये होस्ट मंडळाबरोबर पहिल्या दिवसापासून भाग घेऊन मी त्यांच्याशी समन्वयानं काम नक्कीच करीन. जनरली काय होतं की अधिवेशनात सादर केल्या जाणा-या कार्यक्रमांपैकी कितपत कार्यक्रम तिथे वाढलेल्या आत्ताच्या तरूण जनरेशनला आवडतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे त्यांच्या आवडीचे, पसंतीचे कार्यक्रमही केले पाहिजेत. त्यासाठी अधिवेशनाच्या Format मध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. तरंच त्यांचा चांगला सपोर्ट मिळू शकतो. आणि हीच तरुण पिढी या संस्थेला पुढे चालवणार आहे. सध्या उत्तर अमेरिकेतील राजकारणात सहभाग वाढतोय. त्यादृष्टीने आपल्यातली एकजूट दाखवून इथे महाराष्ट्र पॅटर्न कशाप्रकारे राबविता येईल याचीही चर्चा व्हायला हवी. जेणेकरून आपल्या समस्या मार्गी लागण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर आज सगळ्यांची झालेल्या सोशल मिडियाचा योग्य रितीने वापर करून बीएमएमचा संवाद, बीएमएमचा उद्देश आणखी लोकांपर्यंत पोहचवू शकतो. याचाच एक भाग म्हणजे सगळ्या मंडळाबरोबर Conference Call वरून चर्चा करणे जेणेकरून कुणाच्याही समस्या लवकरात लवकर सोडवता येईल", असे त्यांनी सांगितले.

   श्री. चौघुले गेली अनेक वर्ष बीएमएमबरोबर काम करत असून त्यांना तिथल्या नागरिकांच्या समस्यांचा, त्यांच्या गरजांचा चांगलाच अभ्यास आहे. त्यानुसारंच त्यांनी त्यांच्या पुढील कामगिरीचा आराखडा आखला आहे. त्यांना त्यांच्या या अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल आणि पुढील कारकीर्दीसाठी झगमग टीमतर्फ़े हार्दिक शुभेच्छा....!