Sign In New user? Start here.

चंद्र आहे साक्षीला...

chandra ahe sakshila

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

चंद्र आहे साक्षीला...

lata vinod

   आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी दूध आटवून केशर, पिस्ता, बदाम वगैरे घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. असं सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. कोजागिरी पौणिमा ही ऑक्टोबर किंवा सप्टेबर महिन्यात असते. ह्या दिवशी पाळावयाच्या व्रताला 'कोजागरव्रत' म्हणतात, दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी, असा ह्या व्रताचा विधी सांगितला आहे. रात्री चंद्रपूजा करून त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवितात. या रात्री लक्ष्मी 'को जागर्ति' (कोण जागा आहे?) असे विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल, त्याला धनधान्य देऊन समृध्द करते. कोजागिरी पौर्णिमेस म्हणजे जागृतीचा उत्सव, आनंदाचा उत्सव, उल्हासाचा उत्सव, या दिवशी चंद्र स्वत:च्या सोळाही कलांनी फुललेला असतो. संपूर्ण वर्षापेक्षा त्या दिवसाचा चंद्र सर्वात मोठा वाटतो. चंद्र, चांदणे, दूध, पोहे, साखर सर्वच पांढरे आहेत, म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा धवल रंगी उत्सव गणला जातो. या दिवशी नाचायचे, बागडायचे, गायचे, रास, गरबा खेळायचा असतो.

lata vinod

   लख्ख चंद्र आणि चांदण्यांनी सजलेल्या याच ‘कोजागिरी पौणिमेची’ थिम घेऊन लता विनोद यांच्या गाण्यांची मैफल नुकतीच घेण्यात आली. ही थिम घेऊन करण्यात आलेला कार्यक्रम एक वेगळाच अनुभव देणारा ठरला. नेहमीच रसिकांना आपल्या आवाजाने आणि बहारदार गीतांनी मंत्रमुग्ध करणा-या गायिका लता विनोद यांनी या कार्यक्रमातही चांगलीच रंगत आणली होती. कोजागिरी पौणिमा म्हटलं तर ‘चंद्राला’ एक वेगळंच महत्व असतं. याच चंद्राला आणि चांदण्यांना सोबत घेऊन या मैफलीत ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘रात्र आहे पौणिमेची’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘शुक्रतारा मंद वारा’ आणि ‘कैवल्याच्या चांदण्याला’ ही प्रसिद्ध गीते लता विनोद यांनी सादर केली. आणि रसिकांचा भरभरून प्रतिसाद त्यांना मिळाला.

   लता विनोद यांनी नेहमीच सातासमुद्रापार असलेल्या भारतीय लोकांना भारतीय संगीताची कधी कमी भासू दिली नाही. सतत नव्या-जुन्या गाण्यांच्या मैफली त्या आयोजित करतात. वेगवेगळ्या थिम मधून हिंदी-मराठी गीतांनी त्या रसिकांना रिझवत असतात. नुकताच त्यांचा एक हिंदी गीतांचा कार्यक्रम रॅलिघ(नॉर्थ कॅरोलिना) येथे आयोजित करण्यात आला होता. एका मंदिराच्या मदतनिधीसाठी हा कार्यक्रम लता विनोद यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा आनंद ५०० च्यावर रसिकांनी घेतला.