Sign In New user? Start here.

dilip vengsarkar in bmm 2013

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

दिलीप वेंगसरकर बीएमएमच्या व्यासपीठावर

   बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ)च्या जुलै २०१३ मधे प्रॉव्हिडन्स, र्‍होड आयलंड इथे होणार्‍या अधिवेशनात प्रसिद्ध माजी क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांचे अनुभव त्यांच्या मुलाखतीतून रसिकांना ऎकायला मिळणार आहेत. बी.एम.एम.च्या या १६ व्या अधिवेशनात ते मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्या क्रिकेटचा प्रवास उलगडणार असून त्यांची ही मुलाखत श्री.द्वारकानाथ संझगिरी हे घेणार आहेत. या मुलाखतीच्यावेळी रसिकांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.

   दिलीप वेंगसरकर यांनी त्यांची कारकिर्द चांगलीच गाजवली. त्यांनी १९८३ साली वर्ल्ड कप मिळाल्यानंतर निवृत्ती घेतली. अनेक पुरस्कारांनी त्यांनी गौरविण्यात आले आहे. त्यात खेळासाठी सर्वोच्च अर्जुन पुरस्काराने सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या संवाद साधणारे द्वारकानाथ संझगिरी हे प्रसिद्ध स्पोर्ट रायटर असून खॆळांसोबतच सिनेमा आणि सामाजिक विषयांवर सुद्धा ते गेली कित्येक वर्षे लिहित आहेत. त्यामुळे हा या दोन दिग्गजांमधील संवाद रसिकांना एक वेगळा अनुभव देणार यात शंका नाही.