Sign In New user? Start here.
"जशी आपली शाळेबद्दल आत्मीयता असते आणि इतक्या वर्षांनी सुद्धा आपल्याला शाळेची ओढ असते त्याचप्रमाणे उत्तर अमेरिकेतील प्रत्येक

elected bmm president and comity

IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...

बीएमएम अध्यक्षांची आणि कमिटीची निवड

   "जशी आपली शाळेबद्दल आत्मीयता असते आणि इतक्या वर्षांनी सुद्धा आपल्याला शाळेची ओढ असते त्याचप्रमाणे उत्तर अमेरिकेतील प्रत्येक व्यक्तीला BMM बद्दल जवळीक वाटावी आणि ती वाढवण्यासाठी आमची कार्यकारिणी झटेल", असे प्रतिपादन बीएमएमचे नवनियुक्त अध्यक्ष आशिष चौघुले यांनी केले. बृहन महाराष्ट्र मंडळाचं १५वं अधिवेशन नुकतंच शिकागो येथे संपन्न झालं. यात अध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेलावेर मराठी मंडळाचे अध्यक्ष श्री.आशिष चौघुले हे विजयी झाले आहेत.

   तीन दिवस चालणा-या या अधिवेशनात विविध कार्यक्रम तर असतातंच शिवाय बीएमएमच्या अध्यक्षपदाची निवडही केली जाते. अध्यक्षपदाच्या निवडीबरोबरच बीएमएमचा मोठा कारभार सांभाळण्यासाठी लागणा-या कमिटीचीही निवड करण्यात आली असून वेगवेगळ्या शहरातील व्यक्तींची यात निवड करण्यात आली आहे. त्यात नमिता दांडेकर(टोरोन्टो) यांची Secretary म्हणून, अजय दांडेकर(लॉस एन्जेलिस) यांची Treasurer म्हणून, राहूल कर्णिक(डल्लास) यांची EC म्हणून, सुनिल सुर्यवंशी(कनेक्टीकट) यांची EC म्हणून, सुचिता कुलकर्णी-लांबोर(पिट्सबर्ग) यांची EC म्हणून, वसुधा पटवर्धन(बे एरिया) यांची EC म्हणून तर जयंत भोपतकर(सियाटेल) यांचीही EC म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर बीएमएमच्या २०१३ मध्ये होणा-या १६ व्या अधिवेशनाचं ठिकाणही निश्चित झालं असून ह्या अधिवेशनाचं यजमानपद बॉस्टनला मिळालं आहे. या अधिवेशनाचे संयोजक बाल महाले हे असणार आहेत.