Sign In New user? Start here.

चला पप्पांना खूष करूया....

चला पप्पांना खूष करूया....‘फादर्स डे’ च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या फादरसाठी खूप काही करू शकता. तसंची आपल्याला धमाल करण्यासाठी, परिवार एकत्र येण्यासाठी निमित्त हवं असतं. तसंच या निमित्ताने तुम्ही सर्वजन एकत्र येऊन त्यांना आनंद होईल असं काही करू शकता. त्यांच्या रूटीन लाईफमधून त्यांना थोडावेळ का होईना बाहेर काढू शकता. यानिमित्ताने एकत्र फोटोसेशन करण्याचाही चान्स तुम्हाला मिळू शकतो. काय करता येईल यासाठी खाली काही मुद्दे देण्यात आले आहेत...

बाहेर फिरायला जा....

या दिवसाच्या निमित्ताने बाबांच्या आवडीच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करा. किंवा अशा ठिकाणी जा जिथे बाबा जाण्याचा प्लॅन करत होते पण जाऊ शकले नाही. हे सगळं प्लॅनिंग त्यांना न सांगता केलं तर उत्तमच...जर तुम्ही घरातले मोठे असाल तर सर्व प्लॅन करायची जबाबदारी स्वत: घेऊन तयारी करा आणि यातील बाबांना काही करावं लागणार नाही, याची काळजी घ्या आणि त्यांचा त्रास वाचवा. छोट्या छोट्या गोष्टी अरेंज करण्याचा प्रयत्न करा, ज्या बाबांना आवडतात. त्यांना आवडणारे गेम्स, पदार्थ सोबत घ्या. काही जुन्या आठवणी ताज्या करा. त्यांना आवडणारी गाणी वाजवा. त्यांना आवडेल ते सर्व करण्याचा प्रयत्न करा.

धमाल करा...

बाबांना घेऊन कुठे फिरायला गेलात तर त्यांना त्यांचे जुने दिवस पुन्हा आठवतील असं काहीतरी करा. पतंग उडवणं हे प्रत्येकाला आवडत असतं. तुमच्या बाबांनीही कधी पंतग उडवल्या असतील. त्यामुळे पतंगी विकत आणा किंवा घरीच तयार करा, त्यात बाबांचंही सहकार्य घ्या. सोबतच तुमच्या बाबांना खेळायला आवडणारा खेळ सुद्धा तुम्ही खेळू शकता. जर त्यांना क्रिकेट खेळायला आवडत असेल तर त्यांच्या मित्रांना आणि तुमच्या मित्रांनाही एकत्र बोलवून क्रिकेट खेळा...तुमच्या टीममध्ये आणि त्यांच्या टीममद्ये धमाल मॅच लावा.

बाबांकडून काही शिकण्याची संधी

प्रत्येक वडील हे त्यांना करता येणा-या गोष्टी आपल्या मुलांना शिकवत असतात. पुस्तकाला कव्हर लावण्यापासून ते सायकल शिकवण्यापर्यंत त्यांनीच आपल्याला शिकवलेलं असतं. त्याचप्रमाणे त्यांना जर चांगले पदार्थ करता येत असतील तर, त्यांच्याबरोबर ते पदार्थ कसे करतात ते शिकण्याचाही आनंद तुम्ही लुटू शकता. तुम्ही आणि बाबांनी मिळून तयार केलेले ते पदार्थ परिवारासोबत एन्जॉय करा. बाहेर हॉटेलमध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा हा उपाय नक्कीच चांगला ठरेल. अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या तुम्हाला त्यांच्याकडून शिकाव्या वाटतात,त्या त्यांच्याकडून शिकून घ्या. प्रत्येक वडील त्यांचे अनुभव आपल्या मुलाला सांगायला कधीच नाही म्हणत नसतात.

त्यांच्या मित्रांना एकत्र जमवा...

फादर्स डे हा रविवारीच येत असल्याने तुम्ही तुमच्या बाबांच्या मित्रांना फोन करून एकत्र जमवा. त्यासाठीची सर्व तयारी आधीच करून ठेवा. त्यांना आवडणारं ड्रिंक, पदार्थ अरेंज करा. सोबतच त्यांना आवडणारी गाणी प्ले करा. त्यांच्या गप्पांमध्ये

 

झगमगच्या मुख्य पानाकडे

फादर्स डे स्पेशल पानाकडे