Sign In New user? Start here.

‘दमलेल्या बाबाची कहाणी’ सांगणार ‘स्टोरी बुक’

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

‘दमलेल्या बाबाची कहाणी’ सांगणार ‘स्टोरी बुक’

final prarthana

माणसं कितीही देशापासून लांब गेली तरी इथल्या मातीशी नातं जोडलेलचं राहतं. कितीही मॉडर्न आणि पुढारलेले असो किंवा आपण कितीही दाखवलं की सगळी नाती आपण लांब सोडून आलो आहोत, पण एखादा एस.एम.एस., एखादे गाणे, चित्रपटातील सीन किंवा एखादी घटना आपल्याला आपल्या जन्मभूमीची आठवण करून देते. असंच काहीस ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ या गाण्यांवर आधारीत स्टोरी बुक’ हा म्युझिक व्हिडिओ तयार केलेल्या व लॉस ऍजेलीसमध्ये राहणार्‍या प्रार्थना जोशी बरोबर झालं आहे.

प्रार्थना न्युयॉर्क फिल्म अ‍ॅकडमी मध्ये जॉब करते. प्रार्थना आपल्या आईबाबांसोबत संदीप आणि सलील कुलकर्णी यांच्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचा 100 वा प्रयोग पहात होते. हे गाणं ऐकताच प्रार्थना आणि तीच्या आईबाबांना खूप रडू कोसळलं. ते गाणं प्रार्थनाच्या मनात घर करुन गेल. तेव्हापासून ती या गाण्याचा विचार करत होती. त्याच वेळी तिला म्युझिकल असाईनमेंट दिली गेली. तीने याच गाण्यावर व्हिडीओ करायचे ठरवले.

प्रार्थना लॉस ऍजेलीसमध्ये वास्तव्यास होती त्यामुळे हा व्हिडिओ तिथेच तयार करायचा तिने ठरविलं. यामुळे भाषेच्या मर्यादांना तोडून गाणं समजून सांगायची एक खूप चांगली संधी प्रार्थनाला मिळाली. तिने संदीप आणि सलिलला फोन करुन या गाण्यांसाठी परमिशन मागितली. प्रार्थाना म्हणते की सलील आणि संदीप एवढे चांगले आहेत की त्यांनी त्यांच्यापरीने खूप मदत केली. वडील व मुलीच्या भूमिकेसाठी तिने अमेरिकेतील कलाकारांना निवडले. या व्हिडीओमधील गोष्टीसोबत जोडले गेल्यामुळे जगभरातील प्रेक्षकांना हा व्हिडिओ खूप आवडला. प्रार्थना म्हणते, ‘मला वाटतं की शब्दांमध्येच एक अशी ताकद आहे की त्यांची गाणी जगातील सगळ्यांना ऐकता येतील अशी आहेत. जर तुम्हाला हा व्हिडीओ पहायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=9YBv06NRtnA’

- गायत्री तेली.

final prarthana