Sign In New user? Start here.
गेल्या कित्येक महिन्यांपासून उत्तर अमेरिकेतला आणि भारतातला मराठी माणूस ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होता. त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथे होणा-या ..

bmm president ashish chaughule
   गेल्या कित्येक महिन्यांपासून उत्तर अमेरिकेतला आणि भारतातला मराठी माणूस ज्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होता. त्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथे होणा-या अधिवेशनाला आज मोठ्या जल्लोषात सुरवात झाली. २२ ते २३ जुलै दरम्यान चालणा-या या अधिवेशनात प्रेक्षकांना अस्सल मराठमोळे दर्जेदार कार्यक्रम पहायला मिळणार आहेत. या अधिवेशनासाठी भारताबरोबरच इतर देशातूनही शेकडो मराठी रसिक शिकागोत दाखल झाले आहेत.

   दर दोन वर्षांनी वेगवेगळ्या शहरांत घेतल्या जाणा-या बीएमएमच्या अधिवेशनात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिकागोच्या मंडळाने सर्वच प्रेक्षकवर्गांसाठी कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात भारतातील काही कार्यक्रम आहेत तर काही उत्तर अमेरिकेतील आहेत. त्यात नाटक, संगीत, शास्त्रीय संगीत, विविध विषयांवरील व्याख्यान, डान्स प्रोग्राम असे अनेक विविधरंगी कर्यक्रम आयोजित केले आहे. तसेच यावेळी या अधिवेशनाचं आकर्षण ठरणार आहे तो प्रसिद्ध संगीतकार-गायक शंकर महादेवन याचा लाईव्ह परफॉर्मन्स. या मनोरंजक कार्यक्रमांबरोबरच या अधिवेशनात येणा-या प्रेक्षकांना चक्क महाराष्ट्रीयन खाद्य पदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. मराठमोळ्या कार्यक्रमांबरोबरच अस्सल मराठी तडका असलेलं जेवण म्हणजे ‘सोने पे सुहागा’ असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

   तीन दिवस चालणा-या या अधिवेशनात उत्तर अमेरिकेतील, अमेरिकेतील आणि भारतातील कार्यक्रमांचे सादरीकरण केल्या जाणार आहे. यावेळी या कार्यक्रमांमध्ये अमेरिका आणि उत्तर अमेरिकेतील कार्यक्रमांची संख्या जास्त ठेवण्यात आली असून या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक आणि हौशी कलाकार आहेत हे विशेष आकर्षण म्हणावं लागेल. या अधिवेशनाचं एक आणखी वैशिष्ट्य असं सांगता येईल की, यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्याच प्रेक्षकांसाठी कार्यक्रम निवडले आहेत. त्यामुळे सर्वच प्रेक्षकांना आपल्या आवडीच्या कार्यक्रमांची मजा लुटता येणार आहे.

   * बोंबील फ़्राय डे आयफोन अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक-
* बोंबील फ़्राय डे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक -