Sign In New user? Start here.

“गप्पांची भटकंती”

ह्या संस्थेने जुलै च्या Chicago BMM convention मध्ये “योगेश सोमण” लिखित “गप्पा” ह्या...

gappanchi bhatkanti

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

“गप्पांची भटकंती”

  Xperiments Seattle, ह्या संस्थेने जुलै च्या Chicago BMM convention मध्ये “योगेश सोमण” लिखित “गप्पा” ह्या एकांकिकेचा प्रयोग सादर केला. हा प्रयोग इतका यशस्वी झाला की “गप्पा” सगळ्यांना हव्या-हव्याश्या झाल्या. परिणाम स्वरूप अवघ्या एका महिन्यात सुभंग ओक आणि श्रद्धा देवधर, हि दोघं, “गप्पा” सादर करत अमेरिकेच्या काना-कोपऱ्यात पाहोचली. ह्या दौऱ्याचे अनुभव सांगताना सुभंग ओक म्हणाले की, हा एक विक्रमच असेल की U.S मधलीच एक एकांकिका ४ weekends ला, अमेरिकेतल्या ४ वेगवेगळ्या स्थळांना सादर झाली. ह्यात विशेष आभार म्हणजे लेखक “योगेश सोमण” ह्याचे.... त्याने हे प्रयोग सादर करायची परवानगी दिली. सुभंग आणि Xperiments त्यांचे खूप ऋणी आहेत. ह्या सगळ्या ठिकाणां-कडनं कुठलं ही मानधन न घेता (नुसत्या येण्या-जाण्याच्या खर्चावर) हे प्रयोग सादर केले गेले! पण रसिकांचे प्रेम आणि ह्या विविध स्थळांच्या कार्यकारी-समितीच्या लोकांच्या आपुलकीमुळे हे घडू शकले. त्यामुळे त्या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

Gappa Florida

   पहिला प्रयोग सादर झाला तो South Florida Maharashtra Mandal च्या दिवाळी कार्येक्रमात. अध्यक्ष श्री. नितीन वैद्य ह्यांच्या आमंत्रणाला मान देऊन, “गप्पा” २९ ऑक्ट. रोजी सादर झाली. तिकडच्या अपर्णा मतांगे ची हि प्रतिक्रिया:

   “बागेत आल्यापासून सतत कसरत व योगासनं करणारे हे बँकेतले जुनीअर क्लार्क आणि त्यांची गृहिणी, जोडीला भाजी निवडता निवडता संसाराच्या अनेक समस्याचं समाधान शोधीत गप्पा मारणाऱ्या ह्या जोडप्यानी कधी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा पटकावला हे कळलंच नाही!! अभिनयाची सरलता, कुशलता, तसेच आवाजाची योग्य फेक असे अनेक पैलू सुभगच्या अभिनयामध्ये दिसतात. त्याच्या ह्या कौशल्याला अगदी यथोग्य साथ दिली, सुभंग ची सुपत्नी श्रद्धाने. नाटकाच्या sets चा काही गाजावाजा नाही; तर अगदी साधे एक बाकडे आणि सोबत अभिनयाची झालर, संवादांचा पुष्पगुच्छ आणि प्रेक्षकांची दाद ह्यांनीच हे नाटक इतके रंगले, की बाकी कशाची कमतरता जाणवलीच नाही.”

   खरच Seattle हून South Florida ला “diagonally opposite” जाऊन हा प्रयोग करण्याचे समाधान वाटले! हा प्रवास इतका मोठा होता की प्रवासाचा कालावधी तिथे राहण्याच्या कालावधी हून अधिक होता! पण प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे, अपर्णा/दिलीप ह्यांच्या पाहुणचारामुळे आणि प्रेमामुळेच हा प्रवास अगदी सुखमय झाला हे निश्चित.

   दुसऱ्या प्रयोगासाठी “गप्पा” गेल्या Detriot ला. ५ नोव्हेंबर ला. हा प्रयोग त्यांच्या दिवाळी कार्येक्रमात सादर झाला आणि तो ही ५५० लोकांसमोर! अप्रतीम सोहोळा आणि उत्तम management. एवढी लोकं असूनही कार्येक्रम वेळेवर सुरु झाला आणि लोकांना मनापासून आवडला. Detriot च्या शार्दुल आठले ह्यांनी “गप्पा” ला बोलावून घेतले. त्याच्या अविरत प्रयत्नांमुळेच हा प्रयोग शक्य झाला. “उभ्या उभ्या विनोद” च्या संगतीत सुभंग-श्रद्धा च्या “गप्पा” खूप रंगल्या! आशुतोष/दिपाली ह्यांनी सुभग आणि श्रद्धाची खूप काळजी घेतली. अगदी रात्री दीड वाजता हि कलाकारांना जेऊ घालून “अतिथी देवो भवं” हा वाक्प्रचार त्यांनी खरा ठरवला. त्यांचे हि खूप खूप आभार!

Gappa Florida

   तिसरा प्रयोग Oregon Marathi Mandal, Portland इथे १३ नोव्हेंबर ला झाला. Young and dynamic, असच तिथल्या मंडळाचे वर्णन करायला हवं. १२० लोकांसमोर “गप्पा” सादर करताना, एक “amphi-theaterical experiment with an intimacy with the audience” चा आनंद आला. Seattle च्या जवळ असल्याने सुभंग आणि श्रद्धा, Portland ला गाडी ने गेले. ३ तासांचा प्रवास, लगेच प्रयोग आणि लगेचच परतीचा प्रवास. पण त्या आधी तिथल्या कार्य-कारिणी बरोबर dinner होतंच. हा प्रयोग एक सुखद धक्का होता ... कारण एक म्हणजे एवढे लोक “गप्पा” पाहिला येतील असे वाटले नव्हते आणि दुसरं म्हणजे प्रयोगानन्तर मिळालेले “Standing ovation”. साधारण ८०-१०० प्रेक्षक येतील असा अंदाज होता..... पण “गप्पा” लोकांना आवडत होत्या आणि खूप लोकप्रिय ही होत होत्या, हे नक्की. श्री भूषण इंदणे आणि श्रीमती राधा मोघे ह्यांचे हा प्रयोग आयोजित केल्या बद्दल आभार.

Gappa Florida

   CALAA ह्या संस्थेचे Xperiments, अतिशय आभारी आहेत. त्यांच्याच “समीप रंगमंच” ह्या सदराखाली “गप्पा” सर्व प्रथम सादर झाली, शिकागोला. आता त्यांच्याकडे, “गप्पा” सादर करायला CALAA ने Xperiments ला बोलावले. “गप्पा” चा चौथा प्रयोग सादर झाला २० नोव्हेंबर ला, Fremont, California मध्ये. पुन्हा “समीप” करायला वेगळाच आनंद आला. हा हि प्रयोग “House-full” झाल्याने .... प्रयोग सादर करायला खूप धम्माल आली. मुकुंद मराठे आणि मनोज वाडेकर ह्यांच्या सहकार्यामुळेच हे घडू शकले. अश्या प्रकारच्या नाटकंची, संहितांची, नाट्यकर्मींची देवाण-घेवाण आता सुरु झाली पाहिजे. CALAA च्या “समीप” ला, Xperiments Seattle चा नेहेमीच पाठींबा असेल.

   तर असे हे ४ आठवड्यात ४ प्रयोग, अमेरिकेतल्या ४ वेग-वेगळ्या शहरांमध्ये. ह्या प्रयोगांमुळे वेग-वेगळी माणसं भेटली, नवीन ओळखी झाल्या.... आणि हे बंध न तुटणारे असतील, हेच खरं. “गप्पा” च्या निमित्ताने ही संधी सुभंग आणि श्रद्धा ला मिळाली! नव्या वर्षात अजून काही प्रयोग करायचे आहेत... बघू .... कुठे आणि कधी जमतंय ते.