Sign In New user? Start here.

जागतिक मराठी संमेलन ५ व ६ जानेवारीला

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

जागतिक मराठी संमेलन ५ व ६ जानेवारीला

  जागतिक मराठी अकादमीचे १० वे जागतिक मराठी संमेलन दि. ५ व ६ जानेवारी २०१३ रोजी चित्रपटसॄष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे जन्मगाव नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर भूषविणार असून या संमेलनात सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार राज ठाकरे, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल तसेच चित्रपटसॄष्टीतील ज्येष्ठ कलावंत उपस्थित राहणार आहे.

   जगातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वकर्तॄत्वाने यश संपादन करणा-या मराठी व्यक्तींच्या व्यक्तिमत्वाचा परिचय, ज्ञान, मनोरंजन, माहिती, चित्रपट इ. विषयांवर मुलाखती या संमेलनात असतील जास्तीत जास्त महाविद्यालयीन विध्यार्थ्यांची उपस्थिती हे या संमेलनाचे वैशिष्ठ्य असेल.

   या संमेलनाला जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष श्री.रामदार फुटाणे यांच्यातर्फ़े करण्यात आले आहे.

   निमंत्रण बघण्यासाठी येथे क्लिक करा.