Sign In New user? Start here.

मेरी आवाजही पेहचान हैं...!

dilip vengsarkar in bmm 2013

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

मेरी आवाजही पेहचान हैं...!

  प्रत्येक व्यक्तीत कोणती ना कोणती कला असतेच. ती कला जोपासण्यासाठी ते सतत प्रयत्न करीत असतात. काही असेही कलाकार असतात जे त्यांचं पोट भरण्यासाठीचं काम सांभाळून सुद्धा कला जिवंत ठेवतात. ब-याचदा काही कलाकार स्वत:तील कला घडवतात तर काही कलाकारांकडे कला ही उपजतच असते. भारतात आणि भारताबाहेरही असे अनेक मराठी कलाकार आहेत. त्यातीलच एक कलाकार म्हणजे गायिका लता विनोद...हे नाव जेवढं महाराष्ट्रातील लोकांच्या परिचयाचं आहे, तितकच ते भारताबाहेरील मराठी लोकांच्याही परीचयाचं आहे.

   लता विनोद यांनी गायनाला सुरवात केली ती वयाच्या १० व्या वर्षी...त्यावेळी एवढ्या लहान वयात त्या आकाशवाणी वरील ‘गंमत-जंमत’ या प्रसिद्ध कार्यक्रमात गायन करायच्या. तेव्हापासून ते आजतागयत त्यांची नाळ गायनाशी जोडली गेलेली आहे. त्यांनी आत्तापर्यंत भारतात आणि भारताबाहेर अनेक स्टेज शो केले आहेत आणि अजूनही करताहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित सुद्धा केले गेले.

   लता विनोद यांनी गायनाचे सुरवातीचे धडे त्यांच्या पहिल्या गुरू म्हणजेच त्यांची आई संजीवनी फडके यांच्याकडे गिरवले. संजीवनी फडके यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचं उच्च शिक्षण घेतलं आहे. आणि लता विनोद यांनी भारतीय शास्त्रीय संगीत या विषयात एसएनडीटी महाविद्यालय मुंबई येथून पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी या काळात सरला भिडे यांच्याकडे सुद्धा संगीत शिकले.

   भारत सोडून परदेशात गेल्यावर त्यांनी त्यांचं गायन बंद केलं नाही. त्यांच्यातील कलाकार सतत जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केलेत, त्यात त्यांनी हिंदी-मराठी गाणी सादर केलीत. ज्यात चित्रपट संगीतासोबतच शास्त्रीय संगीताचाही समावेश होता. लता विनोद यांचे लाईव्ह कॉन्सर्ट तर चालू असतात. त्याशिवाय त्यांनी मराठी संस्कृतीचं जतन करणा-या बृह्नमहाराष्ट्र मंडळाच्या अनेक अधिवेशनांमध्ये सुद्धा गायन केले आहे. त्यात डेलावेर, फिलाडेल्फीया, न्य़ू जर्सी, हॉस्टन, अटलांटा या अधिवेशनांचा समावेश करता येईल.

   लता विनोद यांची खासियत म्हणजे त्या पूर्णवेळ फक्त गायन करीत नसून त्या अमेरीकेतील एका नावाजलेल्या फार्मासिटीकल कंपनीसाठी उच्च पदावर सुद्धा आहेत. कला आणि काम या दोन्हींचां चांगला समतोल त्यांनी साधला आहे. जे सहसा सर्वांनाच जमतं असं नाही. त्यासाठी तो व्यक्ती मुळातच कलाकार असावा लागतो.

   अमित इंगोले