Sign In New user? Start here.

‘प्रेमाची गोष्ट’ खास नॉर्थ अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

‘प्रेमाची गोष्ट’ खास नॉर्थ अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी

   महाराष्ट्राच्या कानाकोप-यात सुपरहिट ठरलेला सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘प्रेमाची गोष्ट’ हा चित्रपट बघण्याची संधी आता खास नॉर्थ अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांना मिळणार आहे. झगमग(zagmag.net) आता ही संधी सातासमुद्रापार असलेल्या रसिकांना देत आहे.

   सातासमुद्रापार वसलेल्या मराठी नागरीकांचं मराठी कलेशी असलेलं नातं अतुट असल्याचं सर्वश्रूत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तिकडे गेलेल्या अनेक कार्यक्रमांना, नाटकांना ते भरघोस प्रतिसाद देत असतात. ही त्यांची मराठी कलेची आवड ध्यानात घेऊन त्यांना उत्तम आणि दर्जेदार मराठी चित्रपट सुद्धा बघता यावे यासाठी झगमग(zagmag.net) सतत प्रयत्नशिल असते. ह्याचाच भाग म्हणून झगमग खास नॉर्थ अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत साधी, सरळ आणि सोपी ‘प्रेमाची गोष्ट’. या सिनेमात तुम्हाला प्रतिभावंत अभिनेता अतुल कुलकर्णी आणि चक दे फेम अभिनेत्री सागरिका घाटगे यांची प्रेमाची गोष्ट बघायला मिळणार आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ या सिनेमाच्या शो सोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्याशी प्रत्यक्षात गप्पा मारण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. ह्या चित्रपटाचा शो आयोजित करण्यासंबंधी अधिक माहितीसाठी अदिती मोहिले यांना This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. ई-मेल वर किंवा 9930818828 या मोबाईल नं. वर संपर्क करा.