Sign In New user? Start here.

‘संगीत मानापमान’चा प्रयोग बीएमएम अधिवेशनात

sangeet manapmaan in bmm 2013

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

‘संगीत मानापमान’चा प्रयोग बीएमएम अधिवेशनात

   "नाट्यसंगीत" - दोन शब्दांमधे महाराष्ट्राच्या संगीताचा पूर्ण इतिहास दडलेला आहे. अण्णासाहेब किर्लोस्कर, मास्टर दिनानाथ मंगेशकर, बाल गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, पंडित वसंतराव देशपांडे ही नुसती नाव ऐकूनच अंगावर काटा उभा राहतो मग ह्यांनी गायलेल्या पदांचं तर विचारूच नका. अनेक नाट्यपदं आहेत ज्यांची गोडी कधी कमीच होत नाही. त्या काळात गाजलेल्या संगीत नाटकांपैकी ‘संगीत मानापमान’ हे नाटक अतिशय गाजलेले नाटक आहे. या नाटकाचे पुनरूज्जीवन करण्यात आले असून शास्त्रीय गायक राहूल देशपांडे यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात याचे अनेक प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता हे नाटक बीएमएमच्या १६ व्या अधिवेशनात रसिकांना बघायला मिळणार आहे. याचं दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी यांनी केले आहे तर राहूल देशपांडे यांनी यात मुख्य भूमिका केली आहे.

   परिस्थितीनं गरीब पण कर्तृत्वाने शूर असणारा नायक आणि स्वत:च्या ऐश्वर्याची घमेंड असणारी नायिका’ यामध्ये पहिल्याच प्रवेशात घडलेला संघर्ष यामधून ‘मानापमान’ सुरू होते व नाटकाच्या समाप्तीपर्यंत नायिकेसह प्रेक्षकास स्वर्तृत्व मोठे करण्यास प्रवृत्त करते. श्रीमंत कुळात वाढलेली ‘भामिनी’ ‘धनी मी पती वरीन कशी अधना’ असं म्हणत सेनापती असलेल्या पराक्रमी धैर्यधराशी लग्न करण्यास साफ नकार देते. या अपमानामुळे धैर्यधराच्या मनात भामिनीविषयी शेवटपर्यंत तिरस्कारच दाखवत, ‘स्वत:च्या पराक्रमानेच पत्नी मिळवून दाखविन’अशी ईर्शा यातून दिसून येते.