Sign In New user? Start here.
 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

प्रेमाची बदलती व्याख्या...!

  प्रेम, प्रेम, प्रेम....! अवघ्या तरूणाईच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय....मात्र आजची तरूणाई खरंच प्रेमाची व्याख्या कशी करतात हे पारखून बघणे आवश्यक झाले आहे. सिनेमातून पाहिलेलं, पुस्तकातून वाचलेलं, कुणी सांगीतलेलं...अशा वेगवेगळ्या मार्गातून प्रेम समोर येतं. पण गाडीवर लाबं फिरायला जाणं, हॉटेलमध्ये शेकडो रूपये खर्च करणं, मल्टीप्लेक्समध्ये कॉर्नरची सिट घेऊन सिनेमा बघणं(बघतात की नाही हे त्यांना माहित), महागड्या भेटवस्तू देणं प्रेम इतकच सिमित झालंय का ?

   एक गेली की दुसरी येते, दुसरी गेली की तिसरी येते, अशा कितीतरी येत जात असतात. मान्य आहे की प्रेम फक्त एकदाच होत नाही. ते पुन्हा होऊ शकतं. पण त्याची समीकरणे इतकी का बदलावीत ? जीवनात एकदा एक व्यक्ती येते आणि काही कालावधीनंतर ती दूर जाते किंवा केली जाते. मग आणखी एक व्यक्ती...कधी कधी तर एकाच वेळी एका पेक्षा जास्त व्यक्ती काहींच्या जीवनात असतात. जर आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तीवर प्रेम आहे तर तिला सोडून दुसरीच्या मागे जाण्याची इच्छा तरी कशी होते. ह्याला प्रेम म्हणता येईल ? कवी अशोक थोरात एका कवितेत म्हणतात,

   ‘प्रेम असेही असते का?
कसे कुठेही बसते का?,
मनास लागे ओढ मनाची,
शरीर दुय्यम असते का?.

खरंच आजच्या तरूणाईसाठी शरीर दुय्यम असतं का? हा प्रश्न उभा राहतो.

   एखादी व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. ऎकमेकांचे विचार, आवडी निवडी जुळायला लागतात. जरी आवडी-निवडी जुळत नसल्या तरी निदान विचार जुळतात म्हणून ते जवळ येतात. त्यांची जवळीक वाढते. मैत्री होते. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. ह्या प्रोसेसला बरेच दिवस लागतात. इतक्या दिवसात ते नक्कीच ऎकमेकांना चांगले जाणत असतीलच. मग तरीही ऎकमेकांपासून दूर जाण्याची वेळ का येते ?

   आज प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांचे घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी ऎकमेकांना जाणून घेतल्यानंतरच लग्नाचा निर्णय घेतला असल्याने ही वेळ का येते. घर म्हटलं की अडचणी आल्याच, अनेक वाईट प्रसंग, कामाचं टेन्शन अशा अनेक घटना घडत असतात. या गोष्टींचं टेन्शन घेऊन घटस्फोट घेण्याची वेळ का यावी ? ज्या व्यक्तीवर आपण एकेकाळी जीवापार प्रेम करायचो. त्या व्यक्तीला आपण असच सोडून द्यायचं ? सोबत घेतलेल्या शपथा, सोबत बघीतलेली स्वप्ने असे एका झटक्यात मातीत मिसळायची वेळ कशी येऊ शकते.त्याशिवाय जे काही प्रॉब्लेम्स असतील ते ऎकमेकांशी बोलून, विचार विनिमय करून का सोडवले जाऊ नये ?

   प्रेम विवाहाला जनरली आई-वडिलांचा विरोध असतो. मग त्यातून मार्ग काढून पळून जाऊन लग्न केले जाते. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, ज्यांनी वाढवलं त्यांच्यापासून आपलं नातं तुटतं. सर्वांचा विरोध सहन करून, लोकांच्या वाईट नजरा सहन करून ज्या प्रेमाला सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न करतात. तेच सा-या जगाला सोडून प्रेमाची साथ देणारे मग ऎकमेकांची साथ सोडायला आतुर असतात. हे का व्हावं ? कुठेतरी तरूणांकडून ह्या गोष्टींचा खोल विचार केला गेला पाहिजे. चार दिवस सोबत राहिले मौज मजा केली ह्याला प्रेम तर म्हणता येणार नाही...ऎकमेकांना किती गर्लफेंड/बॉयफ्रेंड आहे हे बघण्यापेक्षा ऎकमेकांमध्ये प्रेम किती आहे हे बघायला हवं. कि फक्त शरीर सुखासाठी केल्या गेलेल्या त्या नात्याला प्रेम नाव दिलं जातंय. असं जर असेल तर हे कुठेतरी थांबायला हवं नाहीतर प्रेमावर लोकांचा विश्वास राहणार नाही.

   अमित इंगोले