Sign In New user? Start here.

वसुंधरा संस्था विज्ञान प्रसाराचा स्वच्छ झरा

vasundhara institute

 
 
 
 
IMAGE ‘कोकणी शिमगा …………!
मुंबईत मोठ्या हुद्यावर साहेब असलेला इथ गावात आला कि तो गावकरीच मग होळीला लाकडं आणण्या पासून ते देवळात झाडू...
IMAGE करा, महिलांचा रिस्पेक्ट
आज महिला आणि लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत. त्यातील अनेक संस्था...
 

वसुंधरा संस्था विज्ञान प्रसाराचा स्वच्छ झरा

  आज जग २१ व्या शतकात जरी असलं आणि कितीही आधुनिक झालं तरी हे आधुनिकीकरण फक्त शहरी भागापर्यंतच मर्यादीत असल्याचं दिसून येतं. आजही भारतातील अनेक राज्यात अतिशय खालावलेलं शिक्षण मिळतं. शिवाय ग्रामीण भागात जी अंधश्रद्धा आहे. ती दूर करण्यासाठी विज्ञानाचा प्रसार करण्याचं ठरवून निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कुडाळ तालुक्यातील नेरूरपार या गावातील श्री.सी.बी.नाईक यांनी वसुंधरा विज्ञान केंद्राची सुरवात केली. थोर समाजसेवक कै.बाबा आमटे यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केलेल्या नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज लक्षात घेऊन कुडाळ येथे १९९५ सालात या संस्थेची स्थापना केली. मुंबईला बॅंकेत नोकरीला असलेल्या नाईक यांनी काही मित्रांना एकत्र करून ही विज्ञानाच्या प्रसाराची चळवळ वाढवली. या उपक्रमात भारताबाहेर वसलेल्या अनेक व्यक्तींनी वेगवेगळं सहकार्य केलं. या संस्थेचा नुकताच एक कार्यक्रम मुंबई येथे घेण्यात आला. त्यात ‘मराठी बाणा’ हा मराठमोळा कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवाय याच कार्यक्रमात या संस्थेची माहिती देणारा एक विशेषांकही प्रकाशित करण्यात आला. परदेशातील अनेक मदत करणा-या व्यक्तींमध्ये झगमगचे मुख्य अमेरिकास्थित श्री.ललित महाडेश्वर यांनीही भरभरून मदत केली आहे.

zagmag 2011

   आज पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिकाकडे जमाना जास्त लक्ष देत आहे. आज भारतातील अनेक शाळांमध्ये मुलांना विज्ञान हे फक्त पुस्तकातून शिकवलं जातं. मात्र विज्ञानाचे प्रात्यक्षिक प्रत्यक्षात दाखवलेच जात नाही. त्यामुळॆ त्यांना नेमकं विज्ञान काय आहे हे कळतच नाही. याच सर्व गोष्टींचा विचार करून वसुंधरा ट्रस्ट्ने कुडाळ तालुक्यातील गावोगावी जाऊन शाळांमधील मुलांना विज्ञानाचे शिक्षण देणे सुरू केले. यासाठी अमेरिकास्थित डॉ. अनिल नेरूरकर यांनी एक टेम्पो गाडी घेऊन दिली. या गाडीत विज्ञानाची प्रात्यक्षिकं करता येईल अशी सर्वच साधनं ठेवण्यात आली आहेत. सोबतच ५ वी ते १० वी या वर्गांचीं पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत. सोबतच काही शिक्षकही असतात. ही गाडी गावोगावी नेऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकं करून दाखवितात. आत्तापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळामध्ये वर्षातून २ वेळा ही फिरती विज्ञान शाळा भेट देते. १९९५ पासून सुरू झालेल्या या फिरत्या विज्ञान शाळेचा तब्बल २ लाख ७०,००० विद्यार्थ्यांना लाभ मिळाला आहे.

   वसुंधरा ट्रस्ट फक्त हाच उपक्रम करत नाहीतर याव्यतिरीक्त विध्यार्थ्यांच्या फायद्याचे अनेक चांगले उपक्रम राबवतात. ज्यात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन सुद्धा केल्या जातं. भारत सरकार किंवा राज्य सरकार तर्फ़े घेण्यात येणा-या विविध शिष्यवृत्तींसाठी या संस्थेत योग्य मार्गदर्शन केलं जातं. या संस्थेच्या मार्गदर्शनातून आज कितीतरी विद्यार्थी वेगवेगळ्या शिष्यवॄत्ती घेऊन उच्च शिक्षण घेत आहेत. तर कुणी परदेशात देखील उच्च शिक्षण घेत आहेत. हेच या संस्थेचं यश आहे. आज राज्याच्या विविध जिल्ह्यातील विद्यार्थी वसुंधरेच्या मार्गदर्शनासाठी रांग लावतात.

   शिक्षण प्रसाराच्या कार्यांबरोबरच वसुंधरा संस्था ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुद्धा पुरवितात. यासाठी डॉ.वैशाली पडते आणि डॉ.सबनिस यांच्या मदतीने दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यातील २० अतिदुर्गम गावांमध्ये आरोग्य तपासणी केली आहे. अनेक रूग्णांना औषधं दिले जाते. या आरोग्य विषयक कार्यक्रमासाठी अमेरिकेहून डॉ. नेरूरकर यांनी आधुनिक साधन साम्रगी पुरविली आहे. या अतिशय चांगल्या उपक्रमाबरोबरच शिष्यवॄत्ती आणि गुणगौरव समारंभही घेतले जातात. जिल्ह्यात स्कॉलरशीप परिक्षा, १० वी बोर्ड परिक्षा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन सत्कार केला जातो.

zagmag 2011
श्री.जे.जे.महाडेश्वर
(संचालक - सातेरी सॉफ्टवेअर प्रा.लि.)

   वसुंधरा ही सरकारी अनुदान नसलेली संस्था असून या संस्थेत विज्ञानाचे २४ मोठे व ६० लहान प्रयोग मांडलेले आहेत. ज्यांनाही या प्रयोगाची माहिती घ्यावयाची आहे अशांसाठी हे खुले आहे. या प्रयोगशाळेशिवाय संस्थेचे एक स्थायी ग्रंथालय सुद्धा आहे. यातील काही पुस्तके विविध शाळांमध्ये एक महिन्यासाठी दिली जातात. ८९ ते ९० शाळांनी या फिरत्या वाचनालयाचा लाभ घेतला आहे. वसुंधरा संस्थेचं एक संगणक प्रशिक्षण केंद्र सुद्धा आहे. ज्यातून गरजू आणि होतकरू मुलांना संगणकाचं शिक्षण दिलं जातं. तसंच यात ६० वर्षापर्यंतच्या वृद्धासही शिक्षण घेता येतं.

   खरंतर ग्रामीण भागातील हि-यांना हेरून त्यांना आकार देण्याचं महत्वाचं काम वसुंधरा संस्थेतर्फ़े केलं जात आहे. त्यामुळेच देशातील आणि देशाबाहेरील अनेक व्यक्तींनी पुढाकार घेऊन मदत केली आहे. शिवाय या संस्थेतून कुणालाही आर्थिक लाभ मिळत नाही. किंवा सरकारचे कुठले अनुदानही मिळत नाही. तरी आजही अनेक चांगल्या लोकांची कमतरता नाहीये हे या संस्थेच्या कार्यावरून दिसून येतं. अशा या सेवाभावी संस्थेला अमेरिका स्थित सातेरी सिस्टीम प्रा.लि. कंपनीच्या श्री.ललित महाडेश्वर यांनीही विविध प्रकारची मदत केली आहे. शिवाय श्री.ललित महाडेश्वर हे या संस्थेच्या मुंबई स्थानिक कार्यकारी कमिटीचे सदस्य देखील आहेत.

   अमित इंगोले