Sign In New user? Start here.
"अरे विक्रम गोखल्यांचा 'आघात' कधी लागला आणि कधी गेला कळलाच नाही.." रसिकांच्या विनवणीला मान देऊन झगमग आणि सातेरी सिस्टीमने

what is bfd and zagmag


Hotspot

   "अरे विक्रम गोखल्यांचा 'आघात' कधी लागला आणि कधी गेला कळलाच नाही.." रसिकांच्या विनवणीला मान देऊन झगमग आणि सातेरी सिस्टीमने मराठी चित्रपट सृष्टीला अत्याधुनिक जगाच्या बरोबरीने ठेवले आहे. आता तुम्हाला दर शुक्रवारी कुठले चित्रपट प्रदर्शित झाले, हे शोधण्याची गरज उरली नाही. तुमच्या मोबाईल फोनवर "बोंबील फ्रायडे" ताजी खबर घेऊन तयार आहे. बॉलीवूडच्या "लेटेस्ट रिलिज्‌'ची माहिती हवीय? अॅकक्टयर कोण? मराठीत कुठला नवीन सिनेमा येतोय? काय आहे मुव्हीचे रेटिंग ?...खूप सा-या प्रश्नां ना आता एकच उत्तर आहे, "बोंबील फ्राय डे !'. बसल्या जागी मोबाईलवर उघडतोय हा मनोरंजनाचा खजिना "आयफोन' आणि "ऍन्ड्रॉईड' मोबाईल अप्लिकेशनच्या रुपाने.

   * बोंबील फ़्राय डे आयफोन अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक-
* बोंबील फ़्राय डे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी लिंक -

   आज मराठी चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले आहेत. वेगवेगळ्या विषयांना घेऊन चित्रपट निर्मिती सुरू झाली असून मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहचला आहे. पण या चित्रपटांची पुरेपुर माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहचतेच असं नाही. या पार्श्वभूमीवर बोंबील फ्रायडे या अॅेप्लिकेशनवर तुम्ही नवीन रिलीज होणा-या चित्रपटांची सविस्तर माहिती पाहू शकता. त्यात चित्रपटाचे कथानक, ट्रेलर, फोटोज, कलाकार आदी माहिती पाहू शकता. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील रंजक घडामोडीही यावर तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रत्येक शुक्रवारी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचे कथानक, कलाकारांची माहितीही या साईवर देण्यात येते. एखादा चित्रपट तुम्ही बघितला आणि तो तुम्हाला आवडला असेल नसेल तर यावरही तुम्ही स्वतः त्या चित्रपटाला रेटींग सुद्धा देऊ शकता. बोंबील फ्रायडे हे अॅचप्लिकेशनचा प्रेक्षकांना, वाचकांना सहज उपयोग करता यावा म्हणून याची निर्मिती करण्यात आली आहे. तुम्ही तुमच्या आयफोन आणि अन्ड्रॉईडवर हे अॅणप्लिकेशन मोफत डाऊनलोड करू शकता.

   "ऑपेरा सॉफ्टवेअर'ने नुकताच भारतातील इंटरनेट वापराविषयी अहवाल प्रसिद्ध केला. त्यात एकूण युजर्सपैकी 49 टक्के लोक मोबाईलवरून इंटरनेट वापरत असल्याचे समोर आले. मोबाईल अप्लिकेशन्सचा ट्रेन्डही भारतात वाढत आहे. त्यामुळेच "सातेरी'ने मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीचा विचार "बोंबील फ्राय डे'मध्ये केला आहे. मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचता यावे, असा ऍप्लिकेशनचा हेतू आहे, असे "सातेरी सिस्टिम्स्‌'चे प्रमुख ललित महाडेश्वार यांनी सांगितले.

   बोंबील फ्रायडे शिवाय झगमग. नेट ही आमची एक मराठी चित्रनगरीतील आणि भारतातील चालू घडामोडी प्रसिद्ध करणारी अग्रगण्य वेबसाईट आहे. भारताबाहेरीलही मराठी रसिकांना महाराष्ट्रातील चालू असलेल्या मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी वाचायला मिळाव्या यादृष्टीने ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या साईटवर बौद्धीक खुराक, सांप्रत, ग्लोबल अॅिक्टीव्हीटी असे वेगवेगळ्या विषयांचे लिखीत खाद्य वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच नवीन गीतांच्या धूनही ऐकता येतील. तुम्ही नुकत्याच पाहिलेल्या चित्रपटाला रेटींग सुद्धा करू शकता. चित्रपट, नाटक, मालिका, साहित्य, राष्ट्रीय चालू घडामोडी, विशेष मुलाखतीही यावर तुम्ही वाचू शकता आणि ऐकू शकता.

   * झगमग अप्लिकेशन *

   नुकतेच शिकागो येथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात भारतातून, उत्तर अमेरिकेतून आणि कॅनडातून अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर केले जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमांची सविस्तर माहिती तेथे येणा-या प्रेक्षकांना मिळावी यासाठी सातेरी सिस्टीमने झगमग अप्लिकेशन सुरू केले आहे. त्यात तुम्हाला तीन दिवस चालणा-या कार्यक्रमांची माहिती म्हणजेच कोणता कार्यक्रम कोणत्या हॉलमध्ये होणार, कार्यक्रमाची वेळ, कार्यक्रमाचं स्वरूप, त्यातील कलाकार आदी माहिती मिळवता येणार आहे. शिवाय येथे सादर होणा-या कार्यक्रमांच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत. या अप्लिकेशनमध्ये लहान मुलांचे कार्यक्रमांच्या आणि मोठ्यांसाठीच्या कार्यक्रमाच्या कॅटेगरीजची माहितीही देण्यात आली आहे. जेणेकरून प्रत्येकाला आपल्या आवडीच्या कार्यक्रमांची माहिती घेता येईल. या अप्लिकेशनचा मुख्य उद्देश कार्यक्रमांसंबंधी प्रेक्षकांचा गोंधळ उडणार उडू नये म्हणून तीन दिवसात सादर होणा-या कार्यक्रमांची अचूक माहिती देणे हाच आहे.

   या अधिवेशनासाठी खास तयार करण्यात आलेलं हे झगमग अप्लिकेशन तुम्ही तुमच्या आयफोन आणि अन्ड्रॉईडवर बिलकूल फ़्री डाऊनलोड करू शकता.